MLA Rohit Pawar announcement | कर्जत-जामखेड मतदारसंघातील सर्व विभाग प्रमुखांना लवकरच निवासस्थाने उपलब्ध होणार – आमदार रोहित पवारांची घोषणा
कर्जत | MLA Rohit Pawar announcement | कर्जत-जामखेड मतदारसंघातील सर्व विभाग प्रमुखांना सर्वसुविधायुक्त निवासस्थाने उपलब्ध होणार आहेत. याबाबत लवकरच आराखडा बनविला जाणार असून त्याची प्रक्रिया देखील सुरू झाली असल्याचे घोषणा आमदार रोहित पवार यांनी गुरुवारी कर्जतमध्ये केली. या घोषणेमुळे मतदारसंघातील सर्व प्रशाकीय विभाग प्रमुखांच्या निवास्थानांचा प्रश्न मार्गी लागणार असल्याने प्रशासकीय वर्तुळात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. (In Karjat Jamkhed constituency Administrative department heads to get accommodation soon – MLA Rohit Pawar announcement)
महाराजस्व अभियान अंतर्गत (Maharajaswa Abhiyan) आगामी दिवसात अनेक शैक्षणिक दाखले, सातबारा दुरुस्ती यासह पोटखराबा लागवडीखाली आणणे यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. त्या संदर्भात कर्जत येथे महसुल विभागाने (Department of Revenue) आयोजित पत्रकार परिषदेत आमदार पवार बोलत होते. त्यावेळी त्यांनी वरील घोषणा केली. यावेळी प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले, कर्जत तहसीलदार नानासाहेब आगळे, जामखेड तहसीलदार योगेश चंद्रे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अमित निमकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
कर्जत जामखेडसाठी ४७ तलाठी कार्यालय मंजूर
कर्जत जामखेडसाठी ४७ तलाठी कार्यालय मंजूर करण्यात आले आहे.तलाठी कार्यलयालगतच कृषी सहाय्यक कार्यालय देखील सोबत राहणार आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना शासकीय योजना राबविण्यासाठी शासन दरबारी हेलपाटे मारण्याची गरज पडणार नाही. महसुल विषयक अनेक योजना कर्जत उपविभागीय कार्यालयामार्फत राबविले जाणार आहे त्याचा लाभ संबंधित शेतकऱ्यांना घ्यावा असे सांगत कर्जत-जामखेड मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांसाठी उपविभागीय महसुल कार्यालयाद्वारे विविध योजना राबविण्यात येत असून लाभार्थी शेतकरी, खातेदार आणि विद्यार्थी वर्गांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत केले.
डिसेंबर २१ अखेर सर्व पोटखराबा क्षेत्र लागवडीखाली आणणार
यावेळी प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले म्हणाले की, महाराजस्व अभियान दोन्ही तालुक्यात अतिक्रमित रस्ते मोकळे करण्यात आले आहे. पोटखराबा क्षेत्र लागवडीखाली आणण्यात आले असून यासाठी महसुल विभागाच्यावतीने विशेष मोहीम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. लाभार्थी शेतकऱ्यांनी देखील या अभियानाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा. डिसेंबर २१ अखेर सर्व पोटखराबा क्षेत्र लागवडीखाली घेण्यात येईल असा विश्वास व्यक्त केला.
प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शुक्रवारी फेरफार अदालत
दफनभूमी, स्मशामभूमी उपलब्ध करणे, शैक्षणिक दाखले तात्काळ उपलब्ध व्हावे यासाठी विशेष मोहीम महसुल विभाग राबविणार आहे. यासह गरजवंत नागरिकांसाठी नवीन रेशनकार्ड देत धान्य देण्यासाठी मोहीम हाती घेत आहोत. फेरफार अदालत नायब तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शुक्रवारी सुरू करणार असल्याचे थोरबोले म्हणाले.
तलाठी दफ्तर तपासणी मोहीम सुरू
सर्व सजेवर तलाठी दफ्तर तपासणी मोहीम सुरू केली असून जेणेकरून संबंधित सातबारा, फेरफार, त्यातील नोंदणी तात्काळ चुका दुरुस्त केली जातील. इ पीक पाहणी शेतकरी स्वता लावत असल्याने तलाठीकडे जाणे यासाठी थांबले आहे.
अहमदनगर – करमाळा मार्गाच्या जमीन संपादनापोटी लाभार्थीना २२० कोटी रुपयांचे वाटप
तसेच कर्जत तालुक्यातून नगर करमाळा मार्गासाठी ९२% जमिनीचा ताबा शासनाने घेतला असून त्यासाठी संबंधित लाभार्थीना मोबदला देखील देण्यात आला आहे. यासाठी तब्बल २२० कोटी रुपयांचे वाटप करण्यात आली असल्याची माहिती डॉ थोरबोले यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, प्रा विशाल मेहेत्रे, सुनील शेलार, भास्कर भैलुमे, रज्जाक झारेकरी, बबन नेवसे, इकबाल काझी, सोशल मीडियाचे दीपक यादव, पृथ्वीराज चव्हाण आदी उपस्थित होते.
web titel : MLA Rohit Pawar announcement | In Karjat Jamkhed constituency Administrative department heads to get accommodation soon – MLA Rohit Pawar announcement