जामखेड : संपूर्ण देशभरामध्ये न्यायालय विधी समितीच्या वतीने कायदेविषयक मार्गदर्शन महिना उपक्रम राबवले जाणार आहेत. त्यामध्ये विविध कायद्यांची माहिती समाजाला होणार असून समाजाच्या अडचणी सुटणार आहेत. सामाजिक आर्थिक दुर्बल असलेल्या वंचितांना विधी संदर्भात मार्गदर्शन होणार आहे, लोकन्यायालयाचे फायदे समाजाला समजले पाहिजेत, कायदयाची माहिती सर्वांना झाली पाहिजे व समाजाच्या अडचणी सुटल्या पाहिजेत हा उद्देश आहे असे न्यायाधीश रजनीकांत जगताप यावेळी बोलताना म्हणाले.
सर्वोच्च न्यायालय, राष्ट्रीय विधी सेवा समिती, उच्च न्यायालयाचे महाराष्ट्र राज्य विधी सेवा समिती, जिल्हा विधी सेवा समिती यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड तालुका विधी समितीच्या वतीने 2 ऑक्टोबर गांधी जयंती ते 14 नोव्हेंबर बाल दिवस या कालावधीत प्रत्येक दिवशी जामखेड तालुक्यातील विविध ठिकाणी कायदेविषयक उपक्रम संपन्न होणार आहेत यातून समाजाला कायद्याची माहिती व्हावी हा मुख्य उद्देश आहे असे मनोगत न्यायाधीश रजनिकांत जगताप यांनी व्यक्त केले.
जामखेड तालुका विधी सेवा समिती,वकील संघ, सतरा महाराष्ट्र बटालियन एन.सी.सीअहमदनगर जामखेड यांच्या संयुक्त विद्यमानाने आझादी का अमृत महोत्सव हा उपक्रम राबवला जात आहे. शनिवार कायदेविषयक जनजागृती प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. (Jamkhed Court organizes legal awareness rally) कार्यक्रमाची सुरूवात राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन करून करण्यात आली.
तसेच या रॅलीमध्ये लोक न्यायालय चे फायदे, मानसिक आरोग्य कायदा 1987, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार 2009, मध्यस्थी प्रक्रिया व फायदे, रॅगिंग संदर्भातील कायदे,यांचे पोस्टर कायद्याची माहिती घोषवाक्य यांच्या द्वारे जनजागृती करण्यात आली.
यावेळी जामखेड न्यायालयाचे न्यायाधीश रजनीकांत जगताप, तहसीलदार योगेश चंद्रे ,गट विकास अधिकारी प्रकाश पोळ,वकील बारचे अध्यक्ष संग्राम पोले, प्राचार्य अविनाश फडके प्राचार्य मडके बी के , प्राचार्य श्रीकांत होशिंग, उपमुख्यध्यपक तांबे पी एन, पर्यवेक्षण साळवे डी एन., एडवोकेट कोल्हे जे एम , पाटील व्ही वाय,ढाळे सी ए ,सरकारी अभियोक्ता नागरगोजे,जयभाय पी व्ही,गोले पी व्ही,राऊत पी.के, अमीर पठाण, बोलभट पी बी, बोरा एस एन ,एनसीसी ऑफिसर कॅप्टन गौतम केळकर,अनिल देडे, मयूर भोसले, प्रा रमेश बोलभट,प्रा विनोद सासवडकर, विधी वरिष्ठ लिपिक विनोद नाईकनवरे , दिपक बिडगर, पोलिस विभागाचे सहायक फौजदर शिवाजी भोस, पो कॉ धनराज बिराजदार, अरुण पवार,सह जामखेड महाविद्यालय,लना होशिंग विद्यालय व रयत शिक्षण संस्थेचे श्री नागेश विद्यालयाचे एन सी सी छात्र उपस्थिती होते.