जामखेडच्या आयटीआयमधून नवीन संशोधक निर्माण व्हावेत – प्राचार्य श्रीकांत होशिंग, जामखेड आयटीआयचा दीक्षांत समारंभ उत्साहात संपन्न !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । आयटीआयमध्ये शिक्षण घेत असताना ज्या-ज्या क्षणाला तुम्ही कष्ट घेतले, त्या क्षणांचा गुणगौरव करणारा आजचा हा क्षण आहे. गुरूजनांशी एकरूप राहून तुम्ही कौशल प्रदान केलं. आता संस्थेतून बाहेर पडताना तुम्ही प्रदान केलेल्या कौशल्यातून अधिकचा नवीन संशोधन करता येईल का ? याचा विचार होणे आवश्यक आहे. आपल्या कौशल्याचा उपयोग समाजाला होणे गरजेचं आहे. नवीन संशोधक निर्माण होणे आवश्यक आहे, कारण ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन प्राचार्य श्रीकांत होशिंग यांनी केले.
अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा ऑगस्ट 2022 मध्ये घवघवीत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ 17 सप्टेंबर 2022 रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जामखेड येथे पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानावरून प्राचार्य श्रीकांत होशिंग बोलत होते. यावेळी जामखेड पॉलिटेक्निक व इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य विकी घायतडक, आयएमसी सदस्य प्रवीण उगले, आयटीआयचे प्राचार्य खालीद जहागिरदार सह आदी उपस्थित होते.
औद्योगिक प्रशिक्षण संस्था उद्योगांना कुशल मनुष्यबळ पुरवून देशाच्या आर्थिक विकासात महत्वाची भुमिका बजावतात. या संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अभिमानाने समाजात वावरता यावे, यासाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचनालयाने दीक्षांत समारंभातून विद्यार्थ्यांचा गौरव करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त यावर्षीपासुन राष्ट्रीय श्रम दिन व विश्वकर्मा जयंती दिनाचे औचित्य साधुन 17 रोजी जामखेड शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दीक्षांत समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी संस्थेमधून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
जामखेडच्या आयटीआयमध्ये प्रथमच पदवीदान समारंभ पार पडला. पदवीप्राप्त विद्यार्थ्यांचा हा कौतुक सोहळा पालकांचा उपस्थितीत पार पडला. आपल्या मुलांचा गुणगौरव होत असल्याचे पाहून यावेळी पालकही भारावून गेले. अतिशय आनंदमय वातावरणात हा सोहळा संपन्न झाला. विद्यार्थी या सन्मानाने हरखून गेले होते.प्रशिक्षणार्थी
लोखंडे सुमित आप्पासाहेब (wireman) बेग तमन्ना कासम(Wireman) गवसणे रोहन संतोष (Machinist) या तिघांनी विशेष प्राविण्य मिळाल्याबद्दल त्यांचा विशेष गौरव करण्यात आला.
यावेळी गटनिदेशक गायकवाड के जी, एन एम शेख, ए एस शेख,एल आर तुमेद्वार, श्रीमती भोपळे मॅडम, दगडे सर, तवटे सर, सानप सर आव्हाड सर, शेळके सर, शिक्षकेत्तर कर्मचारी किंबहुने सर,वाघ सर, शिंदे, चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.आर देवगुडे यांनी केले तर आभार व्ही टी मते यांनी मानले.
दीक्षांत समारंभात यांचा करण्यात आला गौरव
निरंजन जाधव, अक्षय मोहळकर, सुदाम पालवे, रईस शेख, ईस्माईल शेख, हनुमंत शिंदे, रोहन गवसने, गणेश चौरे, भाऊसाहेब बांगर विशाल शिकारे, अक्षय कराड, सत्यम शिकारे, भारत कांबळे, रवि शेळके, रामेश्वर कासुळे, सुमित लोखंडे, तमन्ना बेग, हैदरअली शेख, ऋषीकेश शेंडकर, यशवंत पिंपळे, अभिषेक मोहळकर, ऋषीकेश तादगे, दत्तात्रय पखाले, औदुंबर गंधे.