जामखेड तालूका मीडिया क्लबने साजरा केला अनोखा मैत्री दिन, वृक्षारोपण करत दिला निसर्गाशी मैत्रीचा संदेश
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे… पक्षीही सुस्वरे आळविती… येणे सुख रूचे एकांताचा वास.. नाही गुणदोष.. अंगी येत.. संत तुकाराम महाराजांच्या याच अभंगातील विचाराची कृतिशील अंमलबजावणी करण्यासाठी जामखेड तालुका मीडिया क्लबने मैत्री दिनाचे औचित्य साधून रविवारी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
निसर्गाशी असलेल्या बांधिलकीतून जामखेड तालुका मीडीया क्लबने शिऊर येथील वाघजाई डोंगर परिसरात वृक्षारोपण केले. निसर्ग संवर्धनासाठी जामखेड मीडिया क्लबने राबवलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. मीडिया क्लबच्या सदस्यांचे वृक्षांबद्दल असलेले प्रेम आणि आत्मियता या उपक्रमातूून दिसून आली, वृक्षसंवर्धन काळाची गरज आहे. सर्वच घटकांनी वृक्षसंवर्धनासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन शेळके यांनी केले.
आझादी का अमृतमहोत्सव आणि मैत्री दिनानिमित्त जामखेड तालुका मिडीया क्लब आणि जामखेड वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम जामखेड तालुक्यातील शिऊर येथे पार पडला. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन शेळके बोलत होते.
यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन शेळके, जामखेड तालुका मिडीया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराट, उपाध्यक्ष अशोक वीर, सचिव सत्तार शेख, सहसचिव पप्पुभाई सय्यद, कार्याध्यक्ष दत्तात्रय राऊत, संपर्क प्रमुख धनराज पवार, अविनाश बोधले, किरण रेडे, अजय अवसरे, वनपाल प्रविण उबाळे, सरपंच हनुमंत उतेकर, संजय कोठारी, अरूण लटके, वन कर्मचारी श्यामराव डोंगरे, शहाजी नेहरकर, शिवाजी चिलगर, भाऊसाहेब भोगल, राघू सुरवसे, शरद सुर्यवंशी, हरिश्चंद्र माळशिकारे, संजय आडसूळ, बबन महारनवर, बाप्पूसाहेब जायभाय सह आदी उपस्थित होते.
जामखेड तालुका मीडिया क्लबकडून सातत्याने नवनवीन उपक्रम राबवले जात आहे. पत्रकार हितासाठी काम करण्याबरोबरच सामाजीक उपक्रम मीडिया क्लब कडून राबवले जात आहेत. मानवाची निसर्गाची सदैव मैत्री रहावी हाच संदेश देण्यासाठी जामखेड तालुका मिडीया क्लबने मैत्री दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला होता.
निसर्गाशी असलेल्या बांधिलकीतून जामखेड तालुका मीडीया क्लबने शिऊर येथील वाघजाई डोंगर परिसरात वृक्षारोपण केले. निसर्ग संवर्धनासाठी जामखेड मीडिया क्लबने राबवलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. मीडिया क्लबच्या सदस्यांचे वृक्षांबद्दल असलेले प्रेम आणि आत्मियता दिसून आली, वृक्षसंवर्धन काळाची गरज आहे. सर्वच घटकांनी वृक्षसंवर्धनासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे मत वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन शेळके यांनी यावेळी व्यक्त केले.
दरम्यान यावेळी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्त जामखेड तालुका मीडिया क्लबचे सर्व पदाधिकारी, वनविभागाचे सर्व अधिकारी, स्थानिक ग्रामस्थ, पदाधिकारी यांनी हातात तिरंगा घेऊन भारत मातेचा जयजयकार केला. सर्वांनी वृक्षांबद्दल असलेल्या मैत्रीचे अनोखे दर्शन घडवत मैत्रीदिन साजरा केला. राष्ट्रकार्यात वनविभागाचे महत्व मोठे आहे. वनविभागाच्या वृक्षसंवर्धनाच्या कार्यात जामखेड तालूका मीडिया क्लबकडून खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न वृक्षारोपण कार्यक्रमातून रविवारी करण्यात आला.
यावेळी वनपाल प्रविण उबाळे यांनी जामखेड तालुका मीडिया क्लबच्या सर्व सदस्यांचे आभार मानले.