जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड वकिल संघाची नुकतीच निवडणूक पार पडली. यात अध्यक्ष आणि सचिव पदांसाठी निवडणूक झाली तर उपाध्यक्ष, खजिनदार आणि ग्रंथपाल या तीन पदांच्या निवडणूका बिनविरोध झाल्या. यावेळी झालेल्या निवडणुकीत जामखेड वकिल संघाच्या अध्यक्षपदी ॲड. शमा हाजी कादर शेख विजयी झाले तर उपाध्यक्षपदी ॲड. नितीन घुमरे पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
जामखेड वकिल संघाची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत उपाध्यक्ष, खजिनदार, ग्रंथपाल या पदांच्या निवडी बिनविरोध पार पडल्या होत्या, मात्र अध्यक्ष आणि सचिवपदासाठी एकमत न झाल्याने निवडणूक झाली. ही निवडणूक अतिशय चुरशीच्या वातावरणात पार पडली. अध्यक्षपदासाठी जेष्ठ विधिज्ञ ॲड शमा हाजी कादर शेख विरूध्द ॲड हर्षल डोके यांच्यात सामना झाला. शेख हे जेष्ठ विधिज्ञ असल्याने तसेच त्यांची ही शेवटची निवडणूक असल्याने जामखेड वकिल संघाच्या सदस्यांनी शेख यांच्या पाठिशी आपली ताकद लावली होती.या निवडणुकीत शेख हे एका मताने विजयी झाले. त्यांनी डोके यांचा पराभव केला.
तर सचिवपदासाठी झालेल्या निवडणुकीत ॲड कृष्णा शिरोळे विरूध्द ॲड ऋषिकेश डुचे असा सामना झाला. यात शिरोळे हे पाच मतांनी विजयी झाले. या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड चंद्रकांत ढाळे व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पी. एन. ससाणे यांनी काम पाहिले. या निवडणुकीत 79 मतदारांपैकी 77 जणांनी मतदानाचा हक्क बजावला तर एक मत बाद झाले तर एक मतदार गैरहजर राहिले. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक आणि निवड प्रक्रिया पार पडली.
जामखेड वकिल संघाचे नवनिर्वाचित पदाधिकारी खालील प्रमाणे
अध्यक्ष – ऑडिओ शमा हाजी कादर शेख (1 मताने विजयी)
उपाध्यक्ष – ॲड नितीन घुमरे (बिनविरोध)
सचिव – कृष्णा शिरोळे ( 5 मतांनी विजयी)
खजिनदार – ॲड अल्ताफ शेख (बिनविरोध)
ग्रंथपाल – ॲड पप्पु थोरात (बिनविरोध)
दरम्यान, जामखेड वकिल संघाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा न्यायाधीश व्ही. व्ही. जोशी, न्यायाधीश एस. बी. नवले, आर. एस. जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वकील संघाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.