जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यात पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रवादी, भाजप, जामखेड पोलिस स्टेशन व जामखेड तहसील कार्यालय व विविध पत्रकार संघटनांच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.
जामखेड तालुक्यात 6 जानेवारी पत्रकार दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्था व सृजन यांच्या वतीने महावीर मंगल कार्यालयात पत्रकार दिन साजरा करण्यात आला. आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार यांच्या हस्ते तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.
जामखेड तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने जामखेड पंचायत समितीच्या सभागृहात पत्रकार दिन साजरा करण्यात आला. भाजपच्या वतीने तालुक्यातील पत्रकारांना सन्मानित करण्यात आले.
गुरूवारी सायंकाळी जामखेड पोलिस स्टेशनमध्ये पत्रकार दिन साजरा करण्यात आला. पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या हस्ते तालुक्यातील पत्रकारांना सन्मानित करण्यात आले. यावेळी पोलिस उपनिरीक्षक राजू थोरात, पोलिस नाईक अविनाश ढेरे, आबासाहेब आवारे, प्रकाश जाधव सह आदी उपस्थित होते.
जामखेड तहसील कार्यालयाच्या वतीने शुक्रवारी तहसील कार्यालयाच्या सभागृहात पत्रकार दिन साजरा करण्यात आला. कोरोना काळात पत्रकारानी दिलेल्या योगदानाबद्दल जिल्हा प्रशासनाच्यावतीने पत्रकारांना प्रशस्तीपत्र देऊन तहसीलदार योगेश चंद्रे यांनी सन्मानित केले. तसेच पत्रकारांनी स्वता:च्या आरोग्याची काळजी घ्यावी यासाठी सर्व पत्रकारांना आरोग्यपुस्तीका भेट देण्यात आली. यावेळी नायब तहसीलदार भोसीकर, मंडल अधिकारी गव्हाणे सह आदी मान्यवर उपस्थित होते.