कर्जत बाजार समिती सभापती निवडणूक निकाल 2023 : कर्जत बाजार समिती सभापती व उपसभापतीपदी कोणाची वर्णी ? थोड्याच वेळात होणार फैसला
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : संपुर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या कर्जत बाजार समितीवर कब्जा कोणाचा याचा फैसला थोड्याच वेळात होणार आहे. या निवडणुकीत आमदार प्रा.राम शिंदे व आमदार रोहित पवार यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत. दोन्ही गटाकडे 9-9 चे संख्याबळ आहे. कर्जत बाजार समितीच्या सभापती व उपसभापतीपदी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
कर्जत बाजार समितीच्या सभापती व उपसभापती निवडणुकीसाठी कर्जत तालुका स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनलचे प्रमुख आमदार प्रा.राम शिंदे यांनी उमेदवारांची घोषणा केली आहे. सभापतीपदासाठी काकासाहेब तापकीर तर उपसभापतीपदासाठी अभय पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा आमदार प्रा.राम शिंदे यांनी केली आहे.
सभापतीपदाचे उमेदवार काकासाहेब तापकीर यांनी बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादीची साथ सोडत आमदार प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलकडून उमेदवारी केली होती. त्यामुळे राष्ट्रवादीने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती.
दरम्यान, आमदार रोहित पवार गटाने सभापतीपदासाठी गुलाब तनपुरे यांना उमेदवारी दिली आहे. तर उपसभापतीपदासाठी श्रीहर्ष शेवाळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कोण होणार कर्जत बाजार समितीचे सभापती व उपसभापती याचा फैसला थोड्याच वेळात होणार आहे. येथील निवडणूक ईश्वर चिठ्ठीवर जाणार की अदृश्य राजकीय चमत्कार होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे