कर्जत ब्रेकिंग : 22 गंभीर गुन्हे दाखल असलेल्या अट्टल दरोडेखोरास अटक, गावठी कट्ट्यासह 2 लाख 29 हजारांचा मुद्देमाल हस्तगत, अहमदनगर एलसीबीची धडक कारवाई !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : अहमदनगर, बीड व सोलापुर या तीन जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या अट्टल दरोडेखोरास अटक करण्याची धडक कारवाई, अहमदनगर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने पार पाडली आहे. ही कारवाई कर्जत तालुक्यात करण्यात आली. पोलिसांनी अटकेतील आरोपीकडून गावठी कट्ट्यासह २ लाख २९ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यामुळे या आरोपीविरोधात कर्जत पोलिस स्टेशनला आर्मएक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमदनगर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने भगवान ईश्वर भोसले या सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. त्याच्याविरुध्द अहमदनगर व बीड जिल्ह्यात दरोडा, दरोडा तयारी, घरफोडी व चोरीचे असे एकुण २२ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. अहमदनगर एलसीबीच्या टीमने त्याला कर्जत येथून अटक करण्याची कारवाई केली.
श्रीगोंदा गु.र.नं. ४७३/ २३ भादविक ४५४, ३८० व कर्जत गु.र.नं. २४१ / २३ भादविक ३८० या दोन गुन्ह्यांची कबुली भगवान ईश्वर भोसले याने दिली आहे. त्यामुळे श्रीगोंदा आणि कर्जत पोलिस स्टेशनला दाखल असलेले दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.
एलसीबीने अटक केलेल्या भगवान ईश्वर भोसले या आरोपीच्या कब्जातुन ३०,०००/- रुपये किंमतीचा एक गावठी कट्टा, १,२०० /- रुपये किंमतीचे चार जिवंत काडतुस, ६०,०००/- रुपये किंमतीचे १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण, १८,०००/- रुपये किंमतीचे ३ ग्रॅम वजनाची कर्णफुले व मणी १०,०००/- रुपये रोख व १,००,०००/- रुपये किंमतीची टीव्हीएस कंपनीची अपाची मोटार सायकल असा एकुण २,२९,०००/- रुपये किंमतीच्या मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सदर आरोपीला एलसीबीने कर्जत पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. आरोपी विरुध्द कर्जत पोलीस स्टेशन गु.र.नं. ४६८/२०२३ आर्म ॲक्ट ३/२५, ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कर्जत पोलीस स्टेशन करीत आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, डीवायएसपी शशिकांत वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीच्या पथकाने पार पाडली.
भगवान ईश्वर भोसले विरुध्द दाखल गुन्हे खालील प्रमाणे
१) आष्टी जिल्हा बीड : गु.र.नं. ३५५ / १७ भादविक ३९५
२) श्रीगोंदा – गु.र.नं. ८२४ / २० भादविक ४५७, ३८०, ३७९
३) कर्जत – गु.र.नं. ११५१/२० भादविक ४५७, ३८०
४) कर्जत – गु.र.नं. ८७५/२० भादविक ३९९, ४०२
५) सांगोला, जिल्हा सोलापुर – गु.र.नं. १३७२ / २० भादविक ३९५
६) श्रीगोंदा – गु.र.नं. ६७२/ २० भादविक ४५७, ३८०, ४१९, ४१३
७) श्रीगोंदा – गु.र.नं. १०७५/२० भादविक ४५४, ३८०, ४११, ४१३
८) जामखेड – गु.र.नं. २६३/२० भादविक ४५७, ३८०, ३४
९) नगर तालुका – गु.र.नं. १०० / २१ भादविक ३७९, ३४
१०) नगर तालुका – गु.र.नं. ७५ / २१ भादविक ३७९, ३७
११) MIDC : गु.र.नं. ९५ / २१ भादविक ४५४, ४५९, ३८०, ३४
१२) पारनेर – गु.र.नं. १०८/२९ भादविक ४५४, ३८०, ४११, ३४
१३) गु.र.नं. ८४ / २१ भादविक ४५४, ३८०, ३४
१४) नगर तालुका – गु.र.नं. ७४ / २१ भादविक ४५४, ३८०, ४११
१५) नगर तालुका – गु.र.नं. ८७ / २१ भादविक ४५४, ३८०, ३४
१६) चकलंबा, जिल्हा बीड – गु.र.नं. १० / २२ भादविक ३९२
१७) आष्टी, जिल्हा बीड गु.र.नं. ३३ / २२ भादविक ३९५, ३९४, ४५७ (फरार)
१८) अंभोरा, जिल्हा बीड – गु.र.नं. २/ २२ भादविक ४५४, ३०८, २०१, ३४
१९) शिरुर कासार, जिल्हा बीड गु.र.नं. १५ / २२ भादविक ३८०
२०) शिरुर कासार, जिल्हा बीड -गु.र.नं. १६ / २२ भादविक ४५४, ३८०
२१) अमळनेर, जिल्हा बीड गु.र.नं. ७ / २२ भादविक ४५७, ३८०, ३४
२२) पाथर्डी गु.र.नं. १००७/२२ भादविक ४५४, ३८०, ३४