जामखेड टाइम्स वृत्तसेवा : कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे ७६ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मिरजगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर वीर जवान रोहीत कोल्हे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. “माझी माती, माझा देश” या उपक्रमांतर्गत माजी सैनिकांचा मिरजगाव ग्रामपंचायतीकडून सन्मान करण्यात आला.
भारत मातेच्या रक्षणासाठी आपले अमूल्य योगदान देणाऱ्या मिरजगाव मधील माजी सैनिक नारायण कोल्हे, रोहिदास पाचपुते, बाळासाहेब खिळे, दिनकर कोल्हे, देविदास कराळे, दिगांबर कोल्हे या सैनिकांचा मिरजगावच्या सरपंच सुनिता नितीन खेतमाळस व उपसरपंच संगिता आबासाहेब वीरपाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
संपूर्ण देशभरात केंद्र सरकारच्या निर्देशानुसार “आजादी का अमृतमहोत्सव” अभियान गत वर्षभरात राबविण्यात आले. या महोत्सवाचा समारोप ‘मेरी माटी, मेरा देश’ अर्थात ‘माझी माती, माझा देश’ या उपक्रमाने होत आहे. त्याअनुषंगाने मिरजगावचे सुपुत्र शहीद जवान राहुल म्हेत्रे यांच्या कोनशिलाचे अनावरण सरपंच खेतमाळस यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी माझी माती, माझा देश अभियानाच्या अनुषंगाने पंचप्रण शपथ घेण्यात आली.
यावेळी जि.प.सदस्य गुलाब तनपुरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे, नितीन खेतमाळस, डॉ.पंढरीनाथ गोरे, लहू वतारे, डॉ.चंद्रकांत कोरडे, संदीप बुद्धीवंत, सागर पवळ, सलिम आतार, डॉ.शुभांगी गोरे, उज्वला घोडके, प्रकाश चेडे, मनिषा बावडकर, त्रिविना फरताडे, पोपट कोरडे, अनिता कोल्हे, चंद्रकांत हुमे सर्व सदस्य व ग्रामविकास अधिकारी सदाशिव आटोळे, क्लार्क दत्तात्रय तुपे, निशांत घोडके तसेच प्रशांत बुद्धीवंत, शिवाजी नवले, अंकुश म्हेत्रे, कैलास बोराडे, आण्णा बनकर, शिवाजी गायकवाड आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.