Karjat Jamkhed MIDC: कर्जत जामखेडमध्ये एमआयडीसी आणली तर ते फक्त आमदार राम शिंदेचं आणू शकतात – अंबादास पिसाळ
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : सत्तार शेख। आमदार रोहित पवार यांनी आमदार प्रा.राम शिंदे आणि सरकारला बघतोच अशी भाषा वापरत केलेल्या अरेरावीचा कर्जत तालुक्यातील भाजपा नेत्यांनी जोरदार समाचार घेतला आहे. कर्जत जामखेडमध्ये MIDC आणली तर ते फक्त आमदार राम शिंदे साहेबचं आणू शकतात, असे ठणकावून सांगत कोणी मी बघून घेतो अशी भाषा करायची गरज नाही,यापुढे अशी ऐकेरी भाषा कर्जत-जामखेडची जनता खपवून घेणार नाही, असा खणखणीत इशारा भाजपाचे जेष्ठ नेते तथा जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ यांनी दिला आहे
“भाजपाचे जेष्ठ नेते तथा जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ पुढे म्हणाले की, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी मंत्री राम शिंदे साहेब यांच्याबद्दल आमदार रोहित पवार यांनी जे वक्तव्य केलं आहे ते असंसदीय आहे. या कर्जत-जामखेडला हे मान्य होणार नाही. बघून घेऊ ही भाषा अत्यंत चुकीची आहे. राजकारणात अनेक पार्ट्या येतात, अनेक पार्ट्या जातात, अनेक सरकार येतात, अनेक सरकार जातात, पण त्याठिकाणी अशी भाषा कोणी वापरित नाही, परंतू midc च्या विषयात ही भाषा वापरणे इतके काय योग्य नाही, असे म्हणत त्यांनी आपला निषेध नोंदवला.
पिसाळ पुढे म्हणाले, MIDC हा प्रकल्प कर्जत जामखेडच्या भवितव्याचा प्रकल्प आहे, अनेक वेळा आमदार राम शिंदे साहेबांनी तो प्रकल्प प्रस्तावित केलेला आहे. शासनाच्या धोरणानुसार तो प्रकल्प उभा राहील. यात काही दुमत नाही. अनेक तरूणांना त्या ठिकाणी काम मिळेल. सरकार भारतीय जनता पार्टीचे आहे. Midc चा प्रश्न निश्चित मार्गी लागेल. कोणी काळजी करायचं कारण नाही.
कोणी मी बघून घेतो याची भाषा करायची गरज नाही, कर्जत जामखेडमध्ये MIDC आणली तर ते फक्त राम शिंदे साहेबचं आणू शकतात, इतरांना ती येणार नाही, असे म्हणत अंबादास पिसाळ यांनी रोहित पवारांच्या अंदोलनाची हवा काढून घेतली.
रोहित पवारांनी जी ऐकेरी भाषा वापरली त्याचा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने जाहिर निषेध करतो. यापुढे अशी ऐकेरी भाषा कर्जत-जामखेडला चालणार नाही, यापुढे अशी भाषा वापरू नये, असा इशारा यावेळी जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ यांनी दिला.
रोहित पवारांनी स्टंटबाजी न करता सभागृहात मतदारसंघाचे प्रश्न मांडावेत – सचिन पोटरे आमचे नेते राम शिंदे साहेबांचा आमदार रोहित पवार यांनी ऐकेरी उल्लेख केला, त्या विधानाचा आम्ही तीव्र निषेध करतो.खरं पाहता मतदारसंघाचे प्रश्न मांडण्यासाठी अधिवेशन आणि सभागृहात संधी असते, पण रोहित पवारांनी सभागृहाच्या बाहेर स्टंटबाजीचे अंदोलन करून त्यांनी अधिवेशनातल्या आमदारांसह मंत्र्यांना वेठीस धरण्याचा एकप्रकारे प्रयत्न केला. याशिवाय त्यांनी शिंदे साहेबांविषयी असंसदीय भाषा वापरली. यापुढे जर त्यांनी आपली बेताल वक्तव्य थांबवली नाही तर तीव्र स्वरूपाचे अंदोलन हाती घेण्यात येईल. कार्यकर्त्यांना चेतावण्याची भाषा त्यांनी थांबवावी व कर्जत जामखेड मतदारसंघात लोकशाही नांदवावी, असे भाजपाचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे म्हणाले.
शिंदे साहेबांनी तुमची MIDC कुठे आडवली ते दाखवा – काकासाहेब तापकीर
आमदार रोहित पवार यांनी आमदार रा शिंदे साहेबांबद्दल जे वक्तव्य केले ते अत्यंत निषेधार्य आहे. आमदार राम शिंदे साहेब MIDC विषयात आमदार राम शिंदे यांनी अडवणूक केल्याचे पत्र दिले असेल तर ते रोहित पवारांनी दाखवावं, शिंदे साहेब तुमची MIDC कुठं आडवायला गेले, कुठं काय केलं, हे खरं करून दाखवावा, मग राम शिंदे साहेबांच्या बाबतीत बोललं तर योग्य आहे. पण शिंदे साहेबांनी तुमची MIDC कुठेही आडवली नाही, त्याविषयावर ते कुठे बोलले नाहीत, त्यांचा कुठं शब्द नाही, तरी तुम्ही त्यांना अरेरावीची भाषा करता, अशी भाषा कर्जत तालुक्यात चालणार नाही, ती कधीच खपवून घेतली जाणार नाही, असे बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर म्हणाले.