Karjat Market Committee Result : कर्जत बाजार समिती सोसायटी सर्वसाधारण मतदारसंघात आमदार राम शिंदे यांच्या पॅनलचे पाच उमेदवार विजयी !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या कर्जत कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत आमदार प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनलने सोसायटी मतदारसंघात 5 जागांवर विजयश्री खेचून आणली. हा विजय सर्वसाधारण मतदारसंघात झाला आहे.7 पैकी 5 जागांवर हा विजयी मिळाला आहे. इतर जागेचे निकाल अजून हाती आलेले नाही.
कर्जत बाजार समिती निवडणुकीत आमदार प्रा.राम शिंदे विरूध्द आमदार रोहित पवार असा सामना रंगला होता. या निवडणुकीत रोहित पवार यांच्या पॅनलला सोसायटी मतदारसंघात पहिला धक्का बसला आहे. सर्वसाधारण जागेवरील 7 पैकी 5 जागांवर आमदार प्रा राम शिंदे यांच्या पॅनलने विजय मिळवला आहे. कर्जतमध्ये भाजपने आघाडी घेतली आहे.
कर्जत बाजार समिती निवडणूक निकाल : स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनलचे विजयी उमेदवार खालीलप्रमाणे, कर्जत बाजार समिती सोसायटी सर्वसाधारण मतदारसंघाचा निकाल (मिळालेली मते खालील प्रमाणे)
1) अनभुले दादासाहेब एकनाथ – कपबशी – 426 – पराभूत
2) खेतमाळस रमेश बाबुराव – कपबशी – 456 – पराभूत
3) गांगर्डे शरद चंद्रभान – नारळ – 05 – पराभूत
4) गांगर्डे हौसराव – पतंग – 03 – पराभूत
5) घालमे मधुकर बाबूराव – कपबशी – 422 – विजयी
6) जगताप मंगेश रावसाहेब- छत्री – 502 – विजयी
7) तनपुरे गुलाबराव रामचंद्र- कपबशी – 459 – विजयी
8) तापकीर काकासाहेब लक्ष्मण- छत्री – 527- विजयी
9) नवले नंदराम मारूती – छत्री – 459 – विजयी
10) पाटील अभय पांडुरंग- छत्री – 566 – विजयी
11) पाटील संग्राम रावसाहेब- कपबशी – 460 – विजयी
12) पावणे भरत संभाजी – छत्री – 457 – विजयी
13) भोसले रामचंद्र दिगांबर – कपबशी – 362 – पराभूत
14) भोसले संतोष बन्यासाहेब – कपबशी – 369 – पराभूत
15) मांडगे रामदास शंकर – छत्री – 460 – विजयी
16) शिंदे प्रकाश काकासाहेब- छत्री – 433- पराभूत
17) सुद्रिक लालासाहेब काशिनाथ – ट्रॅक्टर – 24 – पराभव