Karjat Market Committee Result : कर्जत बाजार समिती सोसायटी मतदारसंघात आमदार प्रा राम शिंदे यांच्या पॅनलचा 11 पैकी 7 जागांवर दणदणीत विजय !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : कर्जत बाजार समिती निवडणूकीचे निकाल हाती येणार सुरुवात झाली आहे. सर्वसाधारण सोसायटी मतदारसंघात 5 जागांवर विजय मिळवून आघाडी मिळवलेल्या स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनलने सोसायटीच्या इतर तीन मतदारसंघात आणखीन 2 विजय मिळवले. सोसायटी मतदारसंघातील 11 पैकी 7 जागांवर आमदार प्रा राम शिंदे यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनलने दणक्यात विजय मिळवला आहे. आमदार रोहित पवार यांच्या पॅनलला अवघ्या 4 जागांवर समाधान मानावे लागले.
कर्जत बाजार समिती निवडणुकीत आमदार प्रा.राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची सर्वांना उत्सुकता लागली होती. सोसायटी मतदारसंघाचे निकाल हाती आले आहे. यामध्ये आमदार प्रा राम शिंदे, अंबादास पिसाळ, काकासाहेब तापकीर, प्रविण घुले यांच्या गटाने बाजी मारत आमदार रोहित पवारांना मोठा धक्का दिला.
कर्जत बाजार समिती निवडणूक निकाल : सोसायटी मतदारसंघ सर्वसाधारण जागेवरील विजयी उमेदवार खालील प्रमाणे
सोसायटी सर्वसाधारण मतदारसंघ
1) पाटील अभय पांडुरंग- छत्री – 566 – विजयी
2) तापकीर काकासाहेब लक्ष्मण- छत्री – 527 – विजयी
3) जगताप मंगेश रावसाहेब- छत्री – 502 – विजयी
4) पाटील संग्राम रावसाहेब- कपबशी – 460 – विजयी
5) मांडगे रामदास झुंबर- छत्री – 460 – विजयी
6) तनपुरे गुलाबराव रामचंद्र- कपबशी – 459 – विजयी
7) नवले नंदराम मारूती – छत्री – 459 – विजयी
सोसायटी मतदारसंघ- महिला राखीव
1) कळसकर सुवर्णा सतिश – कपबशी – 478 – विजयी
2) गांगर्डे विजया कुंडलिक- छत्री – 515 – विजयी
सोसायटी मतदारसंघ – इतर मागास प्रवर्ग – श्रीहर्ष कैलासराव शेवाळे – कपबशी विजयी
सोसायटी मतदारसंघ- विमुक्त जाती / भटक्या जमाती
वतारे लहू रामभाऊ- छत्री – 486 – विजयी