Karjat murder news | मोबाईल दे म्हणत नवर्‍याने बायकोला भोकसले : बायको ठार, मेव्हणी जखमी !

कर्जत तालुक्यातील राशीन शहर खुनाच्या थरारक घटनेने हादरले.

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : Karjat murder news |  कर्जत तालुक्यातील राशीन शहर (Rashin in Karjat taluka) खुनाच्या थरारक घटनेने हादरले. शुक्रवारी भर सकाळी घडलेल्या या घटनेमुळे कर्जत तालुक्यात मोठी खळबळ उडाली होती.या घटनेत दिपाली भोसले (Deepali Bhosle) या विवाहीत तरूणीचा मृत्यू झाला आहे. तसेच मेव्हणी गंभीर जखमी झाली आहे.या प्रकरणातील आरोपी पती राहुल भोसले (accused husband Rahul Bhosale) याला अवघ्या दोन तासांत कर्जत पोलिसांनी (Karjat Police) बेड्या ठोकल्या आहेत.

याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, कर्जत तालुक्यातील राशीन येथे आज सकाळी 09 ते साडेनऊच्या सुमारास नवर्‍याने पत्नीवर धारदार चाकूने प्राणघातक हल्ला केला. उपचारास घेऊन जात असतानाच पत्नीचा मृत्यू झाला. या हल्ल्यात मयताची बहिणीही गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर कर्जत उपजिल्हा रुग्णालयात (Karjat Sub-District Hospital) उपचार करण्यात येत आहेत.

जखमी लता बारकू ऊर्फ गंगाराम आढाव, (Injured Lata Barku alias Gangaram Adhav) (वय 23) रा बैल बाजारामागे राशीन यांनी कर्जत पोलिस स्टेशनला या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

कर्जत पोलिस स्टेशनला दाखल असलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,कर्जत तालुक्यातील राशिन येथे शुक्रवारी 22 ऑक्टोबर रोजी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास दिपाली राहुल भोसले व लता बारकू आढाव या दोघी बहिणी राशिन येथील एका दुकानावर कामावर जाण्यासाठी सिद्धटेक रस्त्याने जात होत्या.

मोबाईल दे म्हणत नवर्‍याने भोकसले बायकोला

त्याचवेळी मयत दिपाली हिचा पती राहुल सुरेश भोसले (रा.अजिंठानगर,पुणे) हा दोघींजवळ आला. आरोपी राहुल याने पत्नी दिपालीकडे मोबाईलची मागणी केली. यावर दिपाली हिने माझ्याकडे मोबाईल नाही असे सांगताच चिडलेल्या राहूल भोसले याने आपल्या हातातील चाकूने पत्नी दिपाली राहुल भोसले(वय२५हल्ली रा.राशिन ता. कर्जत) हिच्या गळ्यावर वार करून गंभीर जखमी करून ठार केले.

जेवणाच्या डब्यामुळे वाचले मेव्हणीचे प्राण

या प्राणघातक हल्ल्यात दिपाली हिस वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मेव्हणी लता आढाव हिच्यावरही आरोपी राहुल याने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात लता आढाव हिच्या डोक्याला डोळ्याजवळ गंभीर दुखापत झाली.आरोपी राहुल याने मेव्हणीच्या पोटात चाकू भोकसून तिलाही संपवण्याचा प्रयत्न केला परंतु जेवणाचा डबा आडवा लावल्याने मेव्हणी थोडक्यात बचावली.

आरडाओरड झाली आणि आरोपीने ठोकली धुम

दरम्यान मेव्हणीने आरडा ओरड करताच आरोपी राहुल भोसले यांने घटनास्थळाहून धुम ठोकली. त्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेतील दिपाली हिस उपचारासाठी भिगवणला घेऊन जात असतानाच तिचा मृत्यू झाला. तर जखमी लता आढाव हिच्यावर कर्जत उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ग्रामसुरक्षा यंत्रणेमुळे आरोपी झाला गजाआड

भर सकाळी घडलेल्या खुनाच्या घटनेमुळे कर्जतचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव (Karjat police inspector Chandrasekhar Yadav) यांनी  वेगाने तपास हाती घेतला होता तसेच ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या माध्यमांतून सदर घटनेची माहिती राशीन परिसरातील गावांमध्ये कळवली होती.ग्राम सुरक्षा दलाचे सदस्य,पोलीस मित्र यांच्या मदतीने अवघ्या दोन तासात कर्जत पोलिसांनी आरोपी राहुल भोसले यास बेड्या ठोकल्या.

Karjat murder news Husband attacks sharp knife kills wife incident at Rashin in Karjat taluka

कौटुंबिक वादातून झाला खून

मयत दिपाली आणि राहुल भोसले या दोघा नवरा बायकोमध्ये कौटुंबिक वाद असल्याने गेल्या वर्षभरापासून मयत दीपाली ही माहेरी राहत होती. याच कौटुंबिक वादातून राहूल याने दीपालीचा खून केल्याचे बोलले जात आहे. सदर घटनेमुळे राशीन परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

दाजी विरोधात मेव्हणीने दाखल केला खूनाचा गुन्हा

दाजीने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात जखमी झालेल्या मेव्हणीने (लता आढाव) कर्जत पोलिसांत दाजी राहुल सुरेश भोसले याच्याविरोधात खुनाच्या गुन्ह्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ हे करीत आहेत.

News by डाॅ अफरोज पठाण, कर्जत.

 

web titel : Karjat murder news Husband attacks sharp knife kills wife incident at Rashin in Karjat taluka