Karjat Nagar Panchayat election 2021 | उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी उमेदवारांनी फिरवली पाठ
जामखेड टाईम्स वृत्तसेवा । Karjat Nagar Panchayat election 2021 कर्जत नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज पहिल्या दिवशी एक ही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांनी दिली.
कर्जत नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून बुधवार, दि १ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया कर्जतचे प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ अजित थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली आहे.
आज पहिल्या दिवशी कर्जत नगरपंचायतीच्या १७ प्रभागासाठी एकही अर्ज दाखल झाला नसल्याची माहिती डॉ थोरबोले यांनी दिली. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कर्जत नगरपंचायत कार्यलयाच्या आवारात सर्व यंत्रणा प्रशासनाने उभी केली आहे.
मंगळवार, दि ७ डिसेंबर अखेर उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असून दि ४ आणि ५ रोजी शासकीय सुट्टी असल्याने इच्छुक उमेदवारांना अर्ज भरता येणार नाही.
प्रारूप मतदारयादीवर घेण्यात आलेल्या हरकती प्रशासनाकडून शहानिशा करून योग्य पुराव्यानुसार निकाली काढण्यात आल्या आहेत. कर्जत नगरपंचायतीसाठी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली असल्याची माहिती मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी पत्रकारांना दिली. यासह सदर मतदारयादी सर्वसामान्य नागरिकासाठी खुली असल्याची जाधव यांनी म्हटले आहे.