Karjat Nagar Panchayat election updates : कर्जतमध्ये 29 उमेदवारी अर्ज दाखल; महाविकास आघाडीचा पेच सुटेना
जामखेड टाईम्स वृत्तसेवा । Karjat Nagar Panchayat election updates | कर्जत नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या सहाव्या दिवशी २२ उमेदवारांकडून एकूण २९ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांनी दिली.
मागील तीन दिवसांपासून कर्जत नगरपंचायतीसाठी एक ही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नव्हता. शनिवार आणि रविवारी शासकीय सुट्टी असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोनच दिवस बाकी राहिले होते. सोमवार दि ६ रोजी २२ उमेदवारांनी एकूण २९ अर्ज दाखल केली असल्याची माहिती प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ अजित थोरबोले यांनी दिली.
सोमवारी भाजपाकडून १७ प्रभागासाठी १८ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले तर शिवसेना १ आणि काँग्रेसकडून १ उमेदवारी अर्ज दाखल झाला. तर ९ अर्ज अपक्ष म्हणून अर्ज दाखल करण्यात आले आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रशासनाकडून आठ टेबल उभारण्यात आले असून त्यावर १७ प्रभागासाठी अर्ज स्वीकारण्यात येत आहेत उद्या मंगळवारी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत असून मोठी झुंबड पहावयास मिळणार आहे. प्रांताधिकारी थोरबोले यांना तहसीलदार नानासाहेब आगळे आणि मुख्याधिकारी गोविंद जाधव सहकारी म्हणून काम पाहत आहे.
सोमवार, दि.६ रोजी दाखल केलेले उमेदवारी अर्ज खालीलप्रमाणे
प्रभाग १ – संध्या दीपक मांडगे
प्रभाग २ – नीता आजिनाथ कचरे- २ अर्ज, पूजा अनिल कचरे २ अर्ज
प्रभाग ३ – माधुरी समीर ढेरे, रतन रावसाहेब खराडे
प्रभाग ४ – अश्विनी सोमनाथ गायकवाड २ अर्ज, सोनाली विनोद दळवी, अश्विनी पांडुरंग क्षीरसागर
प्रभाग ६ – मोनाली ओंकार तोटे २ अर्ज, गणेश नवनाथ क्षीरसागर
प्रभाग ७ – अक्षय शरद तोरडमल
प्रभाग ८ – बबनराव सदाशिव लाडाणे
प्रभाग १० – कांचन राजेंद्र खेत्रे, मोनिका अनिल गदादे
प्रभाग १४– शिबा तारेक सय्यद, रत्नमाला प्रभाकर साळुंखे २ अर्ज, बागवान नजमा अब्बास २ अर्ज
प्रभाग १६ – सुवर्णा विशाल काकडे
प्रभाग १७ – अनिल मारुती गदादे, धनंजय दादासाहेब आगम, गोकुळ बापू शिंदे, अंकुश तात्याबा दळवी २ अर्ज
यात काहींनी पक्षाचे तर काहींनी अपक्ष अर्ज सादर केले आहेत. भाजपनेही अर्ज दाखल केले आहेत.
महाविकास आघाडीबाबत सोमवारी उशिरापर्यंत अधिकृत माहिती नाही
काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना महाविकास आघाडी करून कर्जत नगरपंचायत निवडणुकीस सामोरे जातील अशी चर्चा पहावयास मिळत असून सोमवारी उशिरापर्यंत पत्रकारांना याबाबत माहिती उपलब्ध करण्यात आली नव्हती. उद्या मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असून महाविकास आघाडी की स्वबळ याचे चित्र स्पष्ट झाले नसल्याने अनेक इच्छुक उमेदवारांची मोठी पंचाईत झाली आहे. आ रोहित पवार आणि दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते यांची बोलणी सुरू असून पुढील राजकीय रणनीती उद्या स्पष्ट करण्यात येईल अशी माहिती एका स्थानिक राजकीय पदाधिकाऱ्यांने नाव न छापन्याच्या अटीवर दिली.
डाॅ अफरोज पठाण, कर्जत प्रतिनिधी