जामखेड टाईम्स वृत्तसेवा | डाॅ अफरोजखान पठाण | 19 जानेवारी 2022 | Karjat Nagar Panchayat result | आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी व काँग्रेसने 15 जागा पटकावत कर्जत नगरपंचायतीवर एकहाती वर्चस्व मिळवले. तर माजीमंत्री राम शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भाजपला अवघ्या 2 जागा मिळाल्या. या निवडणुकीत राम शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भाजपला दारूण पराभवाचा सामना करावा लागला.विकासाच्या राजकारणाला कर्जतच्या जनतेने साथ दिली अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवारांनी दिली. (Karjat Nagar Panchayat result, Rohit Pawar’s big blow to Ram Shinde)
कर्जत नगरपंचायतीच्या 17 जागेची मतमोजणी बुधवारी सकाळी 10 वाजता कर्जत तहसील कार्यालयाच्या आवारात संपन्न झाली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला जनतेने प्रथम क्रमांकाची पसंती देत 12 जागांवर कौल दिला. तर आघाडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने आपल्या तिन्ही जागेवर दिमाखदार विजय संपादन करीत राष्ट्रवादीला साथ दिली.
आ रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी आणि काँग्रेसला 15 जागा मिळाल्या. आघाडीने भाजपाला धोबीपछाड देत सत्ता काबीज केली . तर भाजपाला अवघ्या दोनच जागेवर समाधान मानत आपली अब्रू वाचविता आली. माजीमंत्री राम शिंदे यांना पुन्हा एकदा आ रोहित पवार यांनी जोर का झटका दिला.
- Krushi Mantri Maharashtra 2024 : माणिकराव कोकाटे बनले महाराष्ट्राचे नवे कृषिमंत्री !
- Big News : महायुती सरकारकडून प्रशासनात मोठी खांदेपालट, महाराष्ट्रातील २३ बड्या सनदी अधिकार्यांच्या बदल्या !
- Maharashtra Cabinet portfolio Allocation 2024 : पहिल्यांदाच मंत्री झालेल्या नेत्यांना वजनदार खात्यांची लाॅटरी, तर दिग्गज नेत्यांना मोठा झटका
- Maharashtra Cabinet Portfolio : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर, कोणत्या मंत्र्याकडे कोणते खाते? वाचा संपूर्ण यादी
- Maharashtra Vidhan Parishad Sabhapati niwadnuk 2024 : विधानपरिषद सभापती पदासाठी आमदार प्रा. राम शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल, राम शिंदे यांची सभापतीपदी बिनविरोध निवड होणार !
माजीमंत्री राम शिंदे यांनी प्रचारात आ पवार यांच्यावर दहशतीचे राजकारण करीत असल्याचा आरोप केला होता मात्र आजच्या निकालाने कर्जतकरांनी तो आरोप सपशेल फोल ठरवथ झुगारून लावला. आ पवार यांनी केवळ विकासाच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करीत जनतेला साद घातली होती. जनतेने त्यास मान्यता देत आ रोहित पवार यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास टाकला.
राष्ट्रवादीचा शुन्य ते बारा प्रवास थक्क करणारा
कर्जत नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे खाते शून्य होते. तर आजच्या निवडणुकीत १२ उमेदवारांनी विजय संपादन करीत राष्ट्रवादीचा झेंडा फडकावला. आ रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाने मोठे यश मिळवत भाजपाच्या ताब्यातील नगरपंचायत आपल्याकडे खेचली.
प्रभाग क्रमांक दोनचा निकाल प्रशासनाकडून प्रलंबितच
प्रभाग क्रमांक दोन जोगेश्वरवाडीच्या भाजपाचे उमेदवार नीता कचरे यांनी आपला उमेदवारी अर्ज माघार घेतल्यानंतर त्यास भाजपाने न्यायालयात आव्हान दिले होते. त्यामुळे आजच्या निकालात जोगेश्वरवाडीचा निकाल प्रशासनाकडून जाहीर करण्यात आला नाही. मात्र कचरे यांच्या माघारीनंतर राष्ट्रवादीचे लंकाबाई खरात यांचा एकमेव उमेदवारी अर्ज शिल्लक राहिल्याने त्याचा विजय निश्चित मानला जात आहे.
कर्जत नगर पंचायत विजयी उमेदवार खालील प्रमाणे
1) छाया सुनिल शेलार
2) ताराबाई सुरेश कुलथे
3) प्रतिभा नंदकिशोर भैलूमे
4) भास्कर बाबासाहेब भैलूमे
5) उषा अक्षय राऊत
6) मोहिनी दत्तात्रय पिसाळ
7) नामदेव देवा राऊत
8) सुवर्णा रविंद्र सुपेकर
9) ज्योती लालासाहेब शेळके
10) संतोष सोपान मेहेत्रे
11) अश्विनी गायकवाड
12) रोहिणी सचिन घुले
13) मोनाली ओंकार तोटे
14) सतिश उध्दवराव तोरडमल
15) भाऊसाहेब सुधाकर तोरडमल
16) अमृत श्रीधर काळदाते
17) लंकाबाई देविदास खरात (निकाल राखीव)