जामखेड टाईम्स वृत्तसेवा | सत्तार शेख | कर्जत नगरपंचायतच्या 17 जागांसाठी आज मतमोजणी पार पडली. या निवडणुकीत राष्ट्रवादीने बाजी मारली. मात्र प्रभाग 4 मधील निकाल राष्ट्रवादीला धक्का देणारा ठरला. राष्ट्रवादीची अवस्था गड आला पण सिंह गेला अशी झाली. (Karjat Nagar Panchayat Results Defeat of NCP’s Manisha Sonmali)
प्रभाग चार मध्ये भाजपने खाते खालले . या प्रभागात तिरंगी सामना रंगला होता. राष्ट्रवादीच्या धडाडीच्या कार्यकर्त्या तथा विद्यमान नगरसेविका मनिषा सोनमाळी यांचा यात दारूण पराभव झाला आहे.अश्विनी दळवी यांनी सोनमाळी यांचा पराभव केला.
प्रभाग 4 मधून भाजपच्या उमेदवार अश्विनी ऊर्फ माई गजानन दळवी – गायकवाड यांनी 439 मते घेत राष्ट्रवादीच्या उमेदवार मनिषा सोनमाळी यांचा दारूण पराभव केला. सोनमाळी यांना 272 मते मिळाली तर रासपच्या तिसऱ्या उमेदवार आशा बाळासाहेब क्षीरसागर यांना 27 मते मिळाली. तर नोटाला 2 मते मिळाली, या प्रभागात एकूण 740 मतदान झाले होते.
- Maharashtra Women Minister Portfolio : महायुती सरकार मधील महिला मंत्र्यांकडे कोणत्या मंत्रालयाची जबाबदारी ? जाणून घ्या सविस्तर
- Krushi Mantri Maharashtra 2024 : माणिकराव कोकाटे बनले महाराष्ट्राचे नवे कृषिमंत्री !
- Big News : महायुती सरकारकडून प्रशासनात मोठी खांदेपालट, महाराष्ट्रातील २३ बड्या सनदी अधिकार्यांच्या बदल्या !
- Maharashtra Cabinet portfolio Allocation 2024 : पहिल्यांदाच मंत्री झालेल्या नेत्यांना वजनदार खात्यांची लाॅटरी, तर दिग्गज नेत्यांना मोठा झटका
- Maharashtra Cabinet Portfolio : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर, कोणत्या मंत्र्याकडे कोणते खाते? वाचा संपूर्ण यादी
राष्ट्रवादीच्या उमेदवार मनीषा सोनमाळी यांचा पराभव राष्ट्रवादीला धक्का देणारा ठरला. सोनमाळी यांच्या पराभवामुळे राष्ट्रवादीची अवस्था गड आला पण सिंह गेला अशी झाली आहे.सोनमाळी यांच्याच पराभवाची वेगळी चर्चा रंगू लागली आहे. सोनमाळी यांचे चांगले काम असतानाही त्यांचा कोणी पराभव केला ? याबाबत उलट सुलट चर्चा रंगू लागल्या आहेत. मनीषा सोनमाळी ह्या आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार यांच्या अतिशय विश्वासू म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यांना भावी नगराध्यक्ष म्हणूनही पहिले जात होते. परंतु त्यांचा पराभव झाल्याने राष्ट्रवादीला मोठा झटका बसला आहे.
विजयी उमेदवार यादी
1) छाया सुनिल शेलार
2) ताराबाई सुरेश कुलथे
3) प्रतिभा नंदकिशोर भैलूमे
4) भास्कर बाबासाहेब भैलूमे
5) उषा अक्षय राऊत
6) मोहिनी दत्तात्रय पिसाळ
7) नामदेव देवा राऊत
8) सुवर्णा रविंद्र सुपेकर
9) ज्योती लालासाहेब शेळके
10) संतोष सोपान मेहेत्रे
11) अश्विनी गायकवाड
12) रोहिणी सचिन घुले
13) मोनाली ओंकार तोटे
14) सतिश उध्दवराव तोरडमल
15) भाऊसाहेब सुधाकर तोरडमल
16) अमृत श्रीधर काळदाते
17) लंकाबाई देविदास खरात