Karjat Nagar Panchayat voting | कर्जत नगरपंचायतीच्या मतदानाची तयारी पूर्ण : असे आहे प्रशासनाचे नियोजन

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : Karjat Nagar Panchayat voting | कर्जत नगरपंचायत निवडणुकीसाठीचे उद्या 21 डिसेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. महसुल प्रशासन आणि पोलीस प्रशासनाकडून मतदान प्रकियेसाठी सर्वोतोपरी तयारी करण्यात आली आहे.

कर्जत नगरपंचायतीच्या १२ जागेसाठी १५ मतदान केंद्र स्थापित करण्यात आले असून सर्वसामान्य मतदारांनी निर्भीडपणे मतदान प्रकियेस सामोरे जावे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले (Dr Ajit Thorbole) यांनी केले.

कर्जत नगरपंचायतीसाठी मंगळवार, दि २१ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी कर्जत प्रशासनाकडून १२ जागेसाठी १५ मतदान केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. यासाठी एकूण ९० कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. यासह पाच भरारी पथके आणि ३ राखीव पथक नेमण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांनी दिली.

Karjat Nagar Panchayat voting preparations complete: This is the planning of the administration

जिल्हा परिषद मुलांची शाळा या मतदान केंद्रावर “सेल्फी पॉईंट” तर दादा पाटील महाविद्यालय याठिकाणी “आदर्श मतदान” केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. दुपारी सर्व मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्याना त्यांच्या नियुक्तीच्या ठिकाणी मतदान प्रक्रियेच्या आवश्यक साधनसामुग्रीसह रवाना करण्यात आले होते.

कर्जत नगरपंचायत हद्दीतील सर्वसामान्य नागरिकांनी मतदान करण्यासाठी निर्भीडपणे बाहेर पडत आपला लोकशाहीचा हक्क बजवावा असे आवाहन महसुल आणि पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ अजित थोरबोले यांना सहायक निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदार नानासाहेब आगळे आणि मुख्याधिकारी गोविंद जाधव सहकार्य करीत आहे.

मतदान प्रक्रियेसाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात – पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव

कर्जत नगरपंचायत निवडणुकीसाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यासाठी एक पोलीस निरीक्षक, दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक, दोन पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह १०० पोलीस कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली. मतदान करण्यासाठी सर्वसामान्य मतदारांनी निसंकोच बाहेर पडावे असे आवाहन पोलिस निरीक्षक यादव यांनी केले आहे.