भाविकांच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या राशीनमधील एकास अटक, शांतता-सुव्यवस्था राखण्याचे कर्जत पोलिसांचे आवाहन
जामखेड टाईम्स वृत्तसेवा | राज्यभरातील भाविकांचे आराध्यदैवत असलेल्या राशीन येथील तुकाई देवीची विटंबना करत हातवारे करून व चुकीच्या पद्धतीने बोलून भावना दुखावणाऱ्यास कर्जत पोलिसांनी बुधवार, दि १९ रोजी सायंकाळी जेरबंद केले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली. या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी राशीन बंद ठेवण्यात आले होते. Karjat police call for arrest of one person in Rashin for hurting religious sentiments of devotees
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विनय मेघराज बजाज (रा.राशीन ता.कर्जत) या इसमाने जगदंबा देवीसाठी असणाऱ्या दर्शन रांगेतुन न येता विरुद्ध दिशेने मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात प्रवेश केला. राज्यभरातील भाविकांचे आराध्यदैवत व श्रद्धास्थान असलेल्या श्री तुकाई देवीला हातवारे करून चुकीच्या पद्धतीने बोलून, विटंबना करून भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्या होत्या.त्यामुळे राशीनसह परिसरातील भाविक भक्तांनी रस्त्यावर उतरून या घटनेचा निषेध व्यक्त केला.
अॅड. सचिन रेणूकर यांच्यासह प्रतिभा सचिन रेणुकर (रा.जगदंबा मंदिराशेजारी राशीन ता.कर्जत) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विनय बजाज याच्यावर भा.द.वी कलम २९५, २९५ अ, ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शांतता-सुव्यवस्था राखण्याचे कर्जत पोलिसांचे आवाहन
घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंढे, पोलीस अंमलदार मारुती काळे, तुळशीदास सातपुते, संपत शिंदे यांनी आरोपीस तात्काळ अटक केली. सदरचा प्रकार गंभीर असून आरोपीवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असुन घटनेच्या तपासकामी त्याला जास्तीत जास्त १५ दिवसांची पोलीस कोठडी देण्यासाठी कर्जत पोलिसांकडून न्यायालयाला अहवाल सादर करण्यात येणार आहे. आरोपीस लवकर जामीन होऊ नये यासाठीही न्यायालयात शर्थीचे प्रयत्न करण्यात येईल. कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होणार नाही याची काळजी घेऊन सर्वांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक यादव यांनी केले आहे.
- फक्राबादमध्ये राजकीय भूकंप : सोसायटी संचालकासह राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
- Karjat Jamkhed News : गोरगरिब, दीन-दलित, वंचित आणि शोषितांच्या जमिनी लाटण्यासाठी टपून बसलेल्या परकीय अतिक्रमणाला परतवून लावा – आमदार राम शिंदे
- जवळ्यात राजकीय भूकंप : सोसायटी संचालकांसह प्रभावशाली जनाधार असलेल्या बड्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
- Sandhya Sonawane NCP : राक्षसी महत्वकांक्षा बाळगून मतदारसंघात आलेल्या परकीय शक्तीला गोरगरिबांची ताकद काय असते ते दाखवून द्या – संध्या सोनवणे
- रोहित पवारांचे बंद होतील आता सारे धंदे कारण, निवडून येणार आहेत राम शिंदे, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी कविता सादर करत सांगितला कर्जत-जामखेडचा निकाल !
तडीपारीसाठी प्रस्ताव करणार दाखल – कर्जत पोलीस
आरोपीने केलेला गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असुन यामुळे तमाम जनतेच्या लोकभावना दुखावल्या गेल्या आहेत.आरोपीला लवकर जामीन होऊ नये यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेतच मात्र त्याच्या तडीपारीसाठी देखील प्रस्ताव दाखल करण्यात येणार आहे. राशीन आणि परिसरातील नागरिकांनी कायदा-सुव्यवस्था राखावी.
– चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक कर्जत
आरोपीचे वकीलपत्र न घेण्याचा कर्जत बार असोशियशनचा निर्णय
श्री क्षेत्र राशीन येथील जगदंबा देवी मंदिरामध्ये माथेफिरु नराधम आरोपीने पवित्र देवीची विटंबना करून सर्वांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. अध्यात्मिक, धार्मिक वातावरण बिघडवले आहे. सदर प्रकरणामध्ये मूळ फिर्यादी वकील संघाच्या ॲड. प्रतिभा सचिन रेणुकर यांनी याबाबत रितसर तक्रार नोंदवली आहे. त्यानुसार आरोपीस अटक झालेली आहे. या सर्व बाबींचा विचार करून कर्जत तालुका वकील संघाच्या सर्वच सदस्यांनी आरोपीचे वकीलपत्र घेऊ नये असे आवाहन कर्जत बार असोशियशनच्यावतीने घेण्यात आले.