अहमदनगर : कर्जतची शिवजयंती मिरवणुक मतदारसंघात आली चर्चेत, ढोल वाजवत आमदार प्रा राम शिंदेंनी घेतला शिवजयंती मिरवणुकीत सहभाग !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । कर्जत-जामखेड मतदारसंघात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. कर्जत तालुका सकल मराठा समाजाने आयोजित केलेल्या भव्यदिव्य शिवजयंती उत्सवात माजी मंत्री आमदार प्रा राम शिंदे यांनी ढोल वाजवत सहभाग घेतला. यामुळे ही मिरवणूक मतदारसंघात चांगलीच चर्चेत आली आहे. शिवजयंती मिरवणुकीत सहभागी होत आमदार प्रा राम शिंदे यांनी आजचा दिवस चांगलाच गाजवला.
कर्जत तालुका सकल मराठा समाजाच्या भव्य दिव्य शिवजयंती उत्सव मिरवणुकीत राज्याचे माजी मंत्री तथा आमदार प्रा.राम शिंदे यांनी सहभाग घेतला. यावेळी सुरू असलेल्या जल्लोष पुर्ण मिरवणुकीत सहभागी झालेल्या आमदार प्रा राम शिंदे यांना ढोल वाजवण्याचा मोह आवरता आला नाही. यावेळी आमदार शिंदे यांनी ढोल वाजवण्याचा मनमुराद आनंद लुटला. शिंदे ढोल वाजवत असल्याचे पाहून कार्यकर्त्यांमध्ये मोठा जोश संचारला होता. यावेळी ढोल ताश्याच्या तालावर संपूर्ण मिरवणुकीत वेगळाच जोश संचारला होता.
दरम्यान, आमदार प्रा राम शिंदे हे ढोल वाजवत असताना माजी जिल्हा परिषद सदस्य पै प्रविण दादा घुले पाटलांनी आमदार शिंदे यांना यावेळी चांगलीच दाद दिली. आमदार राम शिंदे यांनी शिवजयंती मिरवणुकीत ढोल वाजवत नोंदवलेला सक्रीय सहभाग मतदारसंघात चर्चेचा विषय ठरला आहे. आमदार राम शिंदे हे ढोल वाजवत असलेले व्हिडीओ वाऱ्यासारखे सोशल मिडीयावर वायरल झाले आहेत.
दरम्यान, आमदार प्रा राम शिंदे यांनी कर्जत शहरात आयोजित शिवजयंती मिरवणुकीत सहभाग घेत रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले व मिरवणुकीत सहभाग घेतला यावेळी कर्जत तालुका सकल मराठा समाजाचे तालुका समन्वयक वैभव ( अप्पू ) लाळगे, सचिन पोटरे, प्रविण घुले सह आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.