खर्डा भुईकोट किल्ला – राज्य संरक्षित स्मारकाच्या जतन व दुरुस्तीकामासाठी मिळाली 54.58 लाख रुपयांची वित्तीय मान्यता
जामखेड टाईम्स वृत्तसेवा । आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्यामुळे जामखेड तालुक्यातील खर्डा किल्ल्याच्या जतन व दुरुस्ती कामासाठी राज्य सरकारकडून 54.58 लक्ष रूपयांच्या निधीस वित्तीय मंजुरी मिळाली आहे.
राज्य सरकारकडून गेल्या काही वर्षांपासून खर्डा किल्ल्याचा विकास सुरू आहे. येथील विकास कामांसाठी सरकारकडून यापुर्वी 4 कोटी 84 लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मंजुरी मिळाली होती.
या स्मारकाचे काम सध्या प्रगतीपथावर असून जवळपास 3 कोटी रुपयांचे काम खर्डा किल्ला येथे पूर्ण करण्यात आले आहे. नव्याने या स्मारकाच्या जतन व दुरुस्तीसाठी 54.58 लाख रुपयांना वित्तीय मान्यता मिळाली आहे.
खर्डा किल्ला विकास कामांसाठी निधी प्राप्त व्हावा याकरिता आमदार रोहित पवार यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा सुरू होता. त्यास यश आले आहे. खर्डा येथील भुईकोट किल्ला स्मारक दुरुस्ती व जतन करण्यासाठी 54 लाख 58 हजार 478 रुपये एवढ्या रकमेस वित्तीय मान्यता मिळाली आहे.
आमदार रोहित पवार यांच्याकडून केले जात आहे. तसेच खर्डा व परिसरात विविध विकासकामांसाठी आमदार रोहित पवार हे सतत प्रयत्नशील आहेत आणि टप्प्याटप्प्याने परिसरातील विकास होत असताना पाहायला मिळतोय, त्यामुळे नागरिकांकडूनही त्यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे.