कर्जत व जामखेड तालुक्यांसाठी महायुती सरकारने दिली दिवाळीची अनोखी भेट, 5 कोटींचा निधी मंजुर : आमदार प्रा.राम शिंदे
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : कर्जत-जामखेड मतदारसंघातील विविध विकास कामे मार्गी लागावीत यासाठी आमदार प्रा राम शिंदे यांनी सरकार दरबारी हाती घेतलेल्या पाठपुराव्याला आणखीन एक मोठे यश मिळाले आहे. ऐन दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने आमदार प्रा.राम शिंदे यांच्या माध्यमांतून कर्जत-जामखेडकरांना मोठे गिफ्ट दिले आहे. मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी ग्रामविकास व पंचायतराज विभागाकडून ग्रामीण भागातील मुलभूत सुविधा पुरवणे या योजनेतून सुमारे पाच कोटींचा भरघोस निधी मंजुर करण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. आमदार प्रा.राम शिंदे यांच्या माध्यमांतून कर्जत-जामखेड मतदारसंघात विकास कामांचा नवा झंझावात निर्माण झाल्याने जनतेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कर्जत-जामखेड मतदारसंघातील विविध गावांमधील स्थानिक लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी आमदार प्रा.राम शिंदे यांच्याकडे ग्रामीण भागात मुलभूत सुविधा निर्माण करण्यात याव्यात अशी मागणी केली होती. आमदार प्रा.राम शिंदे यांनी या मागण्यांची तातडीने दखल घेत नगरविकास व पंचायतराज विभागाकडे या कामांसाठी पाठपुरावा हाती घेतला होता. सरकारने आमदार प्रा.राम शिंदे यांच्या पाठपुराव्याची दखल घेत कर्जत-जामखेड मतदारसंघातील 51 कामांना मंजुरी दिली आहे. यासाठी सुमारे 5 कोटींचा निधी मंजुर करण्यात आला आहे. ही कामे 2023-2024 या आर्थिक वर्षांतील तरतुदींनुसार ग्रामीण भागातील गावांतर्गत मुलभूत सुविधा पुरवणे (लेखाशिर्ष 2515 1238 ) या योजनेतून मंजुर करण्यात आली आहेत. ही कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केली जाणार आहेत.
राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यापासून आमदार प्रा.राम शिंदे यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातील प्रलंबित विविध विकास कामे मार्गी लावण्याचा धडाका हाती घेतला आहे. आजवर त्यांनी करोडो रूपयांचा निधी मतदारसंघात खेचून आणला आहे. आमदार प्रा राम शिंदे हे मंत्री असताना कर्जत-जामखेड मतदारसंघात विकासाचा जो झंझावात निर्माण झाला होता तोच झंझावात आता महायुती सरकारच्या काळात सुरु झाला आहे. आमदार प्रा राम शिंदे यांनी हाती घेतलेल्या पाठपुराव्याला मोठे यश मिळत असल्याने मतदारसंघातील विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजुर होत आहे. यामुळे मतदारसंघातील जनतेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जामखेड तालुक्यातील मंजुर कामे व निधी खालीलप्रमाणे
1) घोडेगाव येथे सभामंडप बांधणे – 10 लाख रूपये
2) हळगाव येथील तुकाईवस्ती येथे बाळू मामा मंदिर सभामंडप बांधणे – 7 लाख रूपये
3) मतेवाडी येथे मतेगल्ली ते कल्याण रांगडे घरे सिमेंट काँक्रिट रस्ता तयार करणे – 8 लाख रूपये
4) कवडगाव येथे नवीन स्मशानभूमी बांधणे – 10 लाख रूपये
5) महारूळी येथे सभामंडप बांधणे – 10 लाख रूपये
6) बाळगव्हाण येथील तुळजाभवानी मंदिर सभामंडप बांधणे – 10 लाख रूपये
7) दिघोळ येथे संत नरहरी सोनार महाराज मंदिर सभामंडप बांधणे – 10 लाख रूपये
8) पाडळी येथील जिल्हा परिषद शाळा संरक्षक भिंत उभारणे – 10 लाख रूपये
9) फक्राबाद येथे कब्रस्थान वाॅल कंपाऊड बांधणे व सुशोभीकरण करणे – 10 लाख रूपये
10) पाटोदा बसस्थानक परिसरात पेविंग ब्लाॅक बसवणे – 10 लाख रूपये
11) बुऱ्हाणपुर येथील मारूती मंदिर सभामंडप बांधणे – 10 लाख रूपये
12) मुंगेवाडी येथे जिल्हा परिषद शाळा इमारत बांधणे – 10 लाख रूपये
कर्जत तालुक्यातील मंजुर कामे व निधी खालीलप्रमाणे
1) कोपर्डी येथे हरणवाडी मारूती मंदिरासमोर सभामंडप बांधणे – 10 लाख रूपये
2) तिखी येथे मारूती मंदिरासमोर सभामंडप बांधणे – 10 लाख रूपये
3) चलाखेवाडी येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर सभामंडप बांधणे – 10 लाख रूपये
4) खुरंगेवाडी येथे हनुमान मंदिरासमोर सभामंडप बांधणे – 10 लाख रूपये
5) राक्षसवाडी खुर्द येथे अहिल्यादेवी यांच्या स्मारकास सभामंडप बांधणे – 10 लाख रूपये.
6) पिंपळवाडी येथील माळवदे वस्ती जिल्हा परिषद शाळेत पेव्हर ब्लॉक बसवणे – 10 लाख रूपये.
7) देऊळवाडी येथे शिवाई मंदिरासमोर पेव्हर ब्लॉक बसवणे – 10 लाख रूपये.
8) दिघी येथे महादेव मंदिरासमोर सभामंडप बांधणे – 10 लाख रूपये.
9) लोणी मसदपुर येथे फिरंगाईदेवी मंदिरासमोर पेव्हर ब्लॉक बसवणे – 10 लाख रूपये.
10) मानेवाडी येथे ज्योतिबा मंदिरासमोर सभामंडप बांधणे – 10 लाख रूपये
11) शिंतोडा येथे भैरवनाथ मंदिरासमोर सभामंडप बांधणे – 10 लाख रूपये
12) हंडाळवाडी येथे गावठाण रस्ता काँक्रिटीकरण करणे – 10 लाख रूपये.
13) अंबी जळगाव येथे बिरोबा मंदिरासमोर सभामंडप बांधणे – 10 लाख रूपये.
14) डोंबाळवाडी येथे तुळजाभवानी मंदिर पेव्हर ब्लॉक बसवणे – 10 लाख रूपये.
15) औटेवाडी येथे जिल्हा परिषद शाळेजवळील रस्ता काँक्रिटीकरण करणे – 10 लाख रूपये
16) नागापूर येथे बुवासाहेब महाराज मंदिर पेव्हर ब्लॉक बसवणे – 10 लाख रूपये.
17) बाभुळगाव खालसा येथे मारूती मंदिरासमोर पेव्हर ब्लॉक बसवणे – 10 लाख रूपये.
18) नेटकेवाडी येथे तुळजाभवानी मंदिरासमोर पेव्हर ब्लॉक बसवणे – 10 लाख रूपये.
19) बाभुळगाव दुमाला येथे मरिमाता मंदिरासमोर सभामंडप बांधणे – 10 लाख रूपये.
20) कोळवडी येथे नविन अंगणवाडी बांधकाम करणे – 10 लाख रूपये.
21) थेरवडी येथे मारूती मंदिरासमोर सभामंडप बांधणे – 10 लाख रूपये.
22) वालवड येथे महादेव मंदिरासमोर सभामंडप बांधणे – 10 लाख रूपये.
23) गोयकरवाडी येथे ज्योतिर्लिंग मंदिरासमोर पेव्हर ब्लॉक बसवणे – 10 लाख रूपये.
24) गुरवपिंप्री येथे महादेव मंदिर आवारात भजनी साहित्य ठेवण्यासाठी खोली बांधणे – 10 लाख रूपये.
25) कोरेगाव येथे सटवाई मंदिरासमोर पेव्हर ब्लॉक बसवणे – 10 लाख रूपये.
26) बहिरोबावाडी येथे यल्लमादेवी मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक बसवणे – 5 लाख रूपये.
27) थेटेवाडी येथे मारूती मंदिरासमोर पेव्हर ब्लॉक बसवणे – 10 लाख रूपये.
28) खांडवी येथे तुकाई मंदिरासमोर सभामंडप बांधणे – 10 लाख रूपये.
29) नागलवाडी येथे नागेश्वर मंदिर सभामंडप बांधणे – 10 लाख रूपये.
30) सितपुर येथे स्मशानभूमी परिसरात पेव्हर ब्लॉक बसवणे – 10 लाख रूपये.
31) घुमरी येथे काळूबाई मंदिरासमोर सभामंडप बांधणे – 10 लाख रूपये.
32) कोळवडी येथे विठ्ठल- रुक्मिणी मंदिरासमोर सभामंडप बांधणे – 10 लाख रूपये.
33) मिरजगाव येथे भारत विद्यालय परिसरात पेव्हर ब्लॉक बसवणे – 10 लाख रूपये.
34) नवसरवाडी येथे यल्लामादेवी मंदिरासमोर सभामंडप बांधणे – 10 लाख रूपये.
35) बारडगाव दगडी येथे सांस्कृतिक सभागृह बांधणे – 10 लाख रूपये.
36) पाटेवाडी येथे मारूती मंदिरासमोर सभामंडप बांधणे – 10 लाख रूपये.
37) रवळगाव येथे खंडोबा मंदिरासमोर सभामंडप बांधणे – 10 लाख रूपये.
38) सुपे येथे मारूती मंदिरासमोर सभामंडप बांधणे 10 लाख रूपये.
39) आनंदवाडी येथे गावठाणमध्ये रस्ता काँक्रिटीकरण करणे – 10 लाख रूपये.
नगरविकास व पंचायतराज विभागाने लेखाशिर्ष 2515 1238 अंतर्गत मतदारसंघातील 51 गावांमधील कामांसाठी 5 कोटींचा निधी मंजुर केला आहे.महायुती सरकारने जनतेला दिवाळीची अनोखी भेट दिली आहे. कर्जत व जामखेड तालुक्यासाठी भरीव निधी मंजुर केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास व पंचायतराज मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील व महायुती सरकारचे मनापासून आभार!