Sangali Shirala Murder News : पोराच्या प्रेमविवाहाची शिक्षा बापाला,  प्रेमप्रकरणातून मुलाच्या वडिलांची हत्या, मुलीकडच्या १२ जणांविरोधात गुन्हे दाखल

Sangali Shirala Murder News :  समाजात प्रेमविवाहाच्या घटना वाढत आहेत. मुलाने प्रेमविवाह (Love Marriage) केल्याची शिक्षा अनेकदा त्याच्या आई-वडीलांना भोगावी लागते. मुलीचे कुटूंबिय मुलाच्या कुटुंबाला या ना त्या कारणाने त्रास देतात. पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारी अशीच एक धक्कादायक घटना पश्चिम महाराष्ट्रातून समोर आली आहे. या घटनेत मुलाने प्रेमविवाह केल्याची जबर शिक्षा त्याच्या आई वडिलांना भोगावी लागली आहे. या घटनेने मुलाच्या वडिलांची हत्या करण्यात आली आहे. या घटनेने महाराष्ट्रात (Maharashtra) मोठी खळबळ उडवून दिली आहे. (Crime News Today )

Sangali Shirala Murder News, Mangle Sangali Shirala, Dadasaheb Ramchandra Chaugule murder news today,Father sentenced for boy's love marriage, son's father killed due to love affair, case filed against 12 people from girl's side,

Sangali Shirala Murder News : मुलाने प्रेमविवाह (love marriage) केल्याची शिक्षा त्याच्या आई वडिलांना भोगावी लागल्याची धक्कादायक घटना सांगलीतील शिराळा तालुक्यातून समोर आली आहे. या घटनेत प्रेमप्रकरणातून मुलाच्या आई वडिलांना मुलीच्या कुटुंबियांसह नातलगांनी विजेच्या खांबाला बांधून बेदम मारहाण केली आहे. ही मारहाण होत असताना अख्खं गाव बघत राहिलं पण त्यांना कोणी सोडवायला गेलं नाही, या घटनेत मुलाच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. मुलीच्या पालकांसह तिच्या नातेवाईकांनी हे हत्याकांड घडवून आणले. या प्रकरणी १२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी सात आरोपींना अटक केली आहे. (Murder News Today)

Sangali Shirala Murder News :  सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यामधील मांगलेमध्ये (Mangle) प्रेम संबंधातून मुलीचे आई वडील,चुलत चुलते आणि नातेवाईकांनी मुलाच्या आई वडिलांना बेदम मारहाण केली. आधी त्यांना दोरीने वीजेच्या खांबाला बांधण्यात आलं आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत मुलाच्या वडीलाचा मृत्यू झाला तर आई गंभीर जखमी झाली आहे. दादासाहेब रामचंद्र चौगुले (Dadasaheb Ramchandra Chaugule) असे मयताचे नाव आहे. या घटनेने शिराळा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून यात सात जण अटकेत आहेत. यामध्ये मुलीचे आई-वडील, चुलता-चुलती, दाजी यांचा समावेश आहे.

Sangali Shirala Murder News : मयत दादासाहेब चौगुले (Dadasaheb Ramchandra Chaugule) यांच्या मुलाचे गावातीलच एका मुलीसोबत प्रेम संबंध होते. या प्रेमसंबंधातून चौगुले यांच्या मुलाने संबंधित मुलीला पळवून नेले होते. याचा राग मुलीच्या नातेवाईकांना होता. दरम्यान दादासाहेब चौगुले हे बुधवारी सकाळी त्यांच्या शेताकडे गेले असता मुलीचे नातेवाईक देखील त्या ठिकाणी आले. आमच्या मुलीला तुमचा मुलगा घेऊन गेलाय, ते कुठे आहेत सांगा असे म्हणून दादासाहेब चौगुले यांना वीजेच्या खांबाला दोरीने बांधून बेदम मारहाण केली. बेदम मारहाणीमुळे दादासाहेब चौगुले हे बेशुद्ध झाले आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी शिराळा पोलिसांनी बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून सात जणांना अटक केली आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली.