jamkhed Rameshwar Hospital : अवघ्या तीन हजार रुपयांत होणार एमआयआर ( MIR will be done at Rameshwar Hospital for just Rs 3,000)
जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जेव्हा मागणी जास्त असते अन सेवा देणारे कमी असतात तेव्हा नफा वाढवण्याची संधी असते. कोरोनाच्या दुसर्या लाटेत तशीच संधी रामेश्वर हाॅस्पीटलच्या (Rameshwar Hospital) जामखेड सीटी स्कॅन सेंटरला (Jamkhed CT Scan Center) आली होती परंतु व्यवसाय वाढीकडे लक्ष न देता कर्जत – जामखेड मतदारसंघातील (Karjat jamkhed constituency} जनतेसाठी माफक दरात सीटी स्कॅन सुविधा उपलब्ध करून दिल्याने जनतेला मोठा दिलासा मिळाला होता. आता एमआरआय सेंटरच्या माध्यमातून रामेश्वर हाॅस्पीटलने जामखेडच्या जनतेला आणखी एक नविन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही सुविधा माफक दरात असणार आहे ही बाब कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी जामखेडमध्ये बोलताना केले. (MIR will be done at Rameshwar Hospital for just Rs 3,000)
आमदार रोहित पवार यांच्या हस्ते शनिवारी जामखेड येथील रामेश्वर हाॅस्पीटलमध्ये एमआरआय सेंटरचा शुभारंभ करण्यात आला. रामेश्वर हाॅस्पीटलने कोरोना काळात बजावलेल्या भूमिकेचे आमदार रोहित पवार यांनी कौतुक केले. एमआयआर सेंटर सुरू झाल्यामुळे मतदारसंघातील गोरगरीब जनतेला मोठा फायदा होणार आहे. तीन हजार रूपयात रामेश्वर हाॅस्पीटलमध्ये एमआयआर करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.
MLA Rohit Pawar inaugurated the MRI Center at Rameshwar Hospital in Jamkhed on Saturday. MLA Rohit Pawar appreciated the role played by Rameshwar Hospital during the Corona period. The launch of the MIR Center will be of great benefit to the poor people of the constituency. MIR facility has been made available at Rameshwar Hospital for Rs. 3,000.
यावेळी तहसिलदार विशाल नाईकवाडे, पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड, मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते, पंचायत समिती सभापती सूर्यकांत मोरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, विजयसिंह गोलेकर, रमेश आजबे,संतोष फिरोदिया, चंद्रकांत राळेभात, हभप महालिंग महाराज, विजय कोठारी, तालुका आरोग्य आधिकारी डाॅ सुनिल बोराडे, वैद्यकीय अधिक्षक डाॅ संजय वाघ, डाॅ संजय राऊत, डाॅ जतिन काजळे, रामेश्वर हाॅस्पीटलचे संचालक डाॅ चंद्रकांत मोरे, डाॅ सुनिल नेमाडे, डाॅ युवराज खराडे, डाॅ सचिन काकडे सह आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ चंद्रकांत मोरे यांनी तर आभार डॉ सचिन काकडे यांनी मानले.
Tahsildar Vishal Naikwade, Inspector of Police Sambhaji Gaikwad, Mininath Dandwate, Panchayat Samiti Chairman Suryakant More, NCP Taluka President Dattatraya Ware, Vijay Singh Golekar, Ramesh Ajbe, Santosh Firodia, Chandrakant Ralebhat, Habhab Mahaling Maharaj, Vijay Kothari, Taluka Health Officer Dr. Sunil Borade, Medical Superintendent Dr. Sanjay Wagh,Dr. Sanjay Raut, Dr. Jatin Kajle, Director of Rameshwar Hospital Dr. Chandrakant More, Dr. Sunil Nemade, Dr. Yuvraj Kharade, Dr. Sachin Kakade were present on the occasion. The program was introductory by Dr. Chandrakant More and thanked by Dr. Sachin Kakade.