आमदार प्रा राम शिंदे यांच्या स्थानिक विकास निधीतून 26 गावांमध्ये बसवल्या जाणार नव्या डिप्या, जिल्हा नियोजन समितीकडे केली 2 कोटींच्या निधीची मागणी !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । लेखाशिर्ष 2515 मधून कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी 5 कोटींचा निधी आणल्यानंतर काही तास उलट नाही तोच मतदारसंघातील 26 गावांमधील सिंगलफेज आणि थ्री फेज डिप्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार प्रा राम शिंदे हे पुढे सरसावले आहेत. मतदारसंघातील शेतकऱ्यांची अन् जनतेची विजेच्या समस्येतून सुटका व्हावी यासाठी, आमदार प्रा राम शिंदे यांच्या कार्यालयाने जिल्हा नियोजन समितीकडे 2 कोटींच्या निधीची मागणी करणारा प्रस्ताव सादर केला आहे.
आपल्या मंत्रिपदाच्या काळात कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असलेल्या आमदार प्रा राम शिंदे यांच्या विकास कामांचा झंझावात पुन्हा एकदा मतदारसंघात निर्माण झाला आहे. आमदार प्रा राम शिंदे यांनी मतदारसंघातील प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी पुढाकार आता घेतला आहे. मतदारसंघात नव्या डिप्या बसवाव्यात अशी मागणी शेतकरी, नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी आमदार प्रा राम शिंदे यांच्याकडे केली होती, या मागणीची आमदार प्रा राम शिंदे यांनी तातडीने दखल घेत मतदारसंघातील 26 गावांमध्ये नव्या डिप्या बसवाव्यात यासाठी निधीची मागणी करणारा प्रस्ताव अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला आहे.
कर्जत-जामखेड मतदारसंघातील 26 गावांमधील डिप्यांच्या कामांना तांत्रिक व प्रशासकीय मंजूरी देऊन 01 कोटी 80 लाख रुपयांचा निधी आपल्या स्थानिक विकास निधीतून उपलब्ध करुन द्यावा, असे मागणी पत्र आमदार प्रा राम शिंदे यांनी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन अधिकारी यांना दिले आहे.
यंदाच्या रब्बी हंगामात मतदारसंघातील शेतकऱ्यांना पुर्ण दाबाने वीज मिळाली नाही, एक सर्किट सोडून एक सर्किट चालवावं लागलं, डिप्यावर लोड येत होता, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या त्रासास सामोरे जावे लागले. शेतकऱ्यांची या त्रासातून सुटका व्हावी यासाठी आमदार प्रा राम शिंदे यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघात अधिकच्या डिप्या मंजुर करण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. नव्या डिप्यांमुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. आमदार प्रा राम शिंदे यांच्या या निर्णयामुळे बळीराजा सुखावला आहे. जनतेने आनंदाचे वातावरण पसरले आहे.
आमदार प्रा राम शिंदे यांच्या स्थानिक विकास निधीतून जामखेड तालुक्यातील सुचवलेले कामे खालील प्रमाणे
1) पिंपरखेड : लबडे मळा गट नंबर 333 मध्ये थ्री पेज डिपी
2) बाळगव्हाण : पवारवस्ती सिंगल फेज डिपी
3) जायभायवाडी : श्रीरामनगर जायभायवाडी येथे डीपी
4) हाळगाव : गट नंबर 156 थ्री फेज डिपी
5) खर्डा : गोपाळघरेवस्ती गट नंबर 33 येथे 25 ची डिपी
6) फक्राबाद: खडक शेतवस्ती येथे डिपी
7) सतेवाडी : जुने गावठाण येथे डिपी
8) चुंबळी : गट नंबर 35 येथे थ्री फेज डिपी
9) धोत्री : अडाले वस्ती येथे 100 केव्ही डीपी
10) जामखेड: वीटकर खडी क्रेशर जवळ गट नंबर 514 येथे थ्री फेज डीपी
आमदार प्रा राम शिंदे यांनी स्थानिक विकास निधीतून कर्जत तालुक्यातील सुचवलेले कामे खालीलप्रमाणे
1) पिंपळवाडी : इनामवस्ती येथे सिंगलफेज डिपी
2) कुळधरण : राहूल निंबोरे वस्ती येथे थ्री फेज डिपी
3) कोरेगाव : तुरकुंडेवाडी येथे सिंगल फेज डिपी
4) कुंभेफळ : पप्पु धोदाड थ्री फेज डिपी
5) चापडगाव : दत्त नगर सिंगल फेज डिपी
6) पाटेगाव : संतोष महारनवर – अर्जुन महारनवर डिपी
7) डिकसळ : वारंगळे वस्ती
8) बाभूळगाव खालसा : सुतारवस्ती येथे सिंगल फेज डिपी
9) गुरव पिंपरी : भगत मांढरे वस्ती येथे थ्री फेज डिपी
10) खरंगेवाडी : मधुकर कुंडलिक गट नंबर 220 मध्ये थ्री फेज डिपी
11) नागमठाण: गावामध्ये वाड्यावर सिंगलफेज डिपी
12) चांदे बुद्रुक: थोरात वस्ती येथे सिंगल फेज डिपी
13) चांदे खुर्द : गंगावणेवस्ती, तिखेवस्ती, गावडेवस्ती, सिंगल फेज डिपी
14) तिखी : तिखी गावठान सिंगल फेज डिपी
15) गणेशवाडी : अहिल्यानगर येथे सिंगल फेज डिपी
16) खेड : गावठाण डिपी