जामखेड टाईम्स वृत्तसेवा : खरीप हंगामातील (Kharif season 2022) पेरण्या करण्यासाठी शेतकरी बांधव सज्ज झाला आहे. परंतू जिल्ह्यात अजूनही दमदार पावसाने हजेरी लावली नाही. पाऊस पडताच शेतकरी वर्ग खते व बियाणे खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर लगबग करताना दिसणार आहे. (Mobile number issued by Ahmednagar Agriculture Department regarding fertilizer, seed complaints)
खरीप हंगामात (Kharif season 2022) शेतकऱ्यांना खते व बियाणे खरेदी करताना कुठलीही अडचण होऊ नये यासाठी जिल्हा कृषी विभागाच्या वतीने उपाय योजना हाती घेण्यास सुरवात झाली आहे.
शेतकऱ्यांना खरीप हंगाम २०२२ साठी खते व बियाणे (fertilizer, seed, ) निविष्ठा उपलब्धतेत अडचणी उदभवल्यास जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक शिवाजीराव जगताप यांनी केले आहे.
शेतकऱ्यांनी आपल्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी ९८९०६०७४८९ या भ्रमणध्वनी क्रमांकावर व जिल्हा परिषदेतील ७५८८१७८८४२ या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहनही जगताप यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.