MPSC Exam Results | ऐश्वर्या शिंदे झाली नायब तहसीलदार : चापडगावच्या शिरपेचात रोवला गेला मानाचा तुरा !

चापडगावमधील पहिली महिला अधिकारी

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : MPSC Exam Results  | 2019 साली घेण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेचा निकाल (MPSC Result) मंगळवारी जाहीर करण्यात आला.

यामध्ये कर्जत तालुक्यातील चापडगाव येथील ऐश्वर्या बाळासाहेब शिंदे या तरुणीने घवघवीत यश मिळवले.ऐश्वर्या हिची नायब तहसीलदार म्हणून निवड झाली आहे. (Aishwarya Shinde of Chapadgaon became the Deputy Tehsildar)

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उपजिल्हाधिकारी, DYSP, तहसीलदार, नायब तहसीलदार सह विविध 26 पदांची 2019 मध्ये परिक्षा घेतली होती. आज जाहिर झालेल्या निकालात 420 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे यामध्ये नायब तहसीलदार म्हणून ऐश्वर्या शिंदे हिची निवड झाली आहे.

नायब तहसीलदार म्हणून निवड झालेली ऐश्वर्या शिंदे ही कर्जत तालुक्यातील चापडगाव येथील रहिवासी आहे. विविध क्षेत्रात कार्यरत असलेले अधिकारी चापडगावमध्ये खूप आहेत. परंतु पहिल्यांदाच चापडगावमधून महिला अधिकारी होण्याचा मान ऐश्वर्याने पटकावला आहे.

ऐश्वर्याने राहुरी कृषी विद्यापीठातून BSC ॲग्री पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. तिथेच तिने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली होती. ऐश्वरार्याचे वडील ॲड बाळासाहेब दत्तात्रय शिंदे हे कर्जत न्यायालयात वकिली व्यवसाय करतात.

चापडगावमधील पहिली महिला अधिकारी होण्याचा मान ऐश्वर्या शिंदे हिने पटकावला आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. (Aishwarya Shinde became the first woman officer in Chapadgaon)

मुलींना संधी मिळाल्यास, त्या संधीचं सोनं करतात हे ऐश्वर्याने दाखवून दिले आहे. ऐश्वर्याच्या निवडीमुळे चापडगावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.प्रत्येक चापडगावकरासाठी ही अभिमानाची बाब आहे.

येणाऱ्या काळात ऐश्वर्याचा आदर्श चापडगाव आणि परिसरातील मुली नक्की घेतील यात तिळमात्र शंका नाही अशी भावना वृक्षवल्ली ग्रुपचे संस्थापक ॲड. विकास शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

MPSC ने जाहीर केलेल्या निकालात प्रसाद चौगुले याने खुल्या प्रवर्गातून प्रथम क्रमांक पटकावला.तर रोहन कुंवर याने मागास वर्गातून प्रथम क्रमांक पटकावला. तसेच महिला प्रवर्गातून मानसी पाटील प्रथम आली आहे.

 

news by sattar shaikh 

 

web titel : MPSC Exam Results Aishwarya Shinde of Chapadgaon became the Deputy Tehsildar