SRPF Jamkhed Group Recruitment Exam | पोलिसांच्या सतर्कतेने मुन्नाभाईचा गेम ओव्हर : SRPF च्या जामखेड ग्रुप परीक्षेतील गैरप्रकार उघड
औरंगाबादेतील एका विरोधात पुण्यात गुन्हा दाखल
पुणे : SRPF Jamkhed Group recruitment Exam | एसआरपीएफ जामखेड ग्रुप भरतीची लेखी परीक्षा आज (रविवार) पुण्यात पार पडली. या परिक्षेत गैरप्रकार झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी एका विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
एसआरपीएफ जामखेड ग्रुप भरतीची परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी व गैरप्रकार रोखण्यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भरारी पथके नेमण्यात आली होती.मात्र, कोथरुड येथील शंकरराव मोरे विद्यालयातील (Shankarrao More Vidyalaya Kothrud) परीक्षा केंद्रावर गैरप्रकार झाल्याचे समोर आले आहे.
पोलिसांच्या सतर्कतेमुळे एकाला मोबाईलचा वापर (Mobile) करुन कॉपी करताना रंगेहात पकडले. केतन विठ्ठल लखवाड Ketan Vitthal Lakhwad (वय 24, रा. मंबापूरवाडी, ता खुलताबाद , जि औरंगाबाद – Aurangabad) असे कॉपी करताना रंगेहात पकडलेल्या परीक्षार्थीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज रविवारी 12 डिसेंबर रोजी एसआरपीएफ जामखेड ग्रुप भरतीची लेखी परीक्षा (SRPF Jamkhed Group Recruitment Exam) शंकरराव मोरे विद्यालय कोथरूड या ठिकाणी होती.या परीक्षेमध्ये परीक्षार्थी केतन लखवाड हा परीक्षा चालू असताना मोबाइलचा वापर करून कॉपी करण्याचा प्रयत्न करीत असताना आढळून आला.
त्याला रंगेहात पकडून त्याच्यावर कोथरूड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) महाराष्ट्र विद्यापीठाच्या मंडळाच्या व इतर विनिर्दिष्ट परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारांना प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 1982 कलम 7 प्रमाणे गुन्हा (Pune Crime) दाखल करण्यात आला आहे.
सिंहगड रोड विभागाचे (Sinhagad Road Division) सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल पवार (ACP Sunil Pawar) आणि कोथरूड पोलिस ठाण्याचे (Kothrud Police Station) वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप (Senior Police Inspector Mahendra Jagtap) यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास कोथरूड पोलिस ठाण्यातील अधिकारी करीत आहेत.