National Anti Ragging Week 2023 : जामखेड तालुक्यातील हळगाव कृषि महाविद्यालयात राष्ट्रीय ॲन्टी रॅगिंग सप्ताह उत्साहात साजरा
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । National Anti Ragging Week 2023 : 18 ऑगस्ट 2023 : राष्ट्रीय ॲन्टी रॅगिंग सप्ताहानिमित्त हळगाव कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ॲन्टी रॅगिंग नियमावलीबाबत जागरूक करण्यात आले. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या परिसरात शिस्तीचे पालन करून कोणतेही बेजबाबदार कृत्य न करण्याच्या सुचना यावेळी देण्यात आल्या. येणाऱ्या शैक्षणिक वर्षांत वसतिगृहात नव्याने येणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याचे आवाहन सहयोगी अधिष्ठाता डॉ. गोरक्ष ससाणे यांनी केले.
भारतातील विद्यापीठे व महाविद्यालयांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा खेळीमेळीच्या वातावरणात व्यक्तिमत्व विकास व्हावा, शिक्षण घेत असताना त्यांना कोणत्याही शैक्षणिक अडचणी येवू नये यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने २०२३ या वर्षात भारतातील सर्व विद्यापीठे व महाविद्यालयांत राष्ट्रीय ॲन्टी रॅगिंग सप्ताह १२ ते १८ ऑगस्ट या कालावधीत साजरा करण्याचे निर्देशित केले होते.
त्या अनुषंगाने महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालय, हाळगाव येथे शुक्रवार, १८, ऑगस्ट, २०२३ रोजी राष्ट्रीय ॲन्टी रॅगिंग सप्ताह साजरा झाला. महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. गोरक्ष ससाणे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी विद्यार्थी परिषद उपाध्यक्ष डॉ. दत्तात्रय सोनावणे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. पोपट पवार, सहाय्यक प्राध्यापक डॉ. मनोज गुड व डॉ. नजिर तांबोळी सह आदी उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांना लघुपटाद्वारे ॲन्टी रॅगिंगची इत्यंभूत माहिती दाखविण्यात आली, ज्यामध्ये ॲन्टी रॅगिंग वेबसाईट, टोल फ्री क्रमांक, तक्रार नोंदणी प्रक्रिया इत्यादी बाबींचा समावेश होता.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. प्रणाली ठाकरे, डॉ. निलेश लांडे, डॉ. महेश निकम यांनी विशेष मेहनत घेतली. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. मनोज गुड तर आभारप्रदर्शन डॉ. अंबादास मेहेत्रे यांनी केले.