आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर राष्ट्रवादीत होणार राजकीय भूकंप, पवारांचा विश्वासू भिडू BRSमध्ये प्रवेश करणार !
सोलापूर : अगामी 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची सर्वच राजकीय पक्षांनी तयारी हाती घेतलीय.तेलंगणा माॅडेल (Telangana model) घेऊन दिल्ली काबीज करण्याचे स्वप्न बाळगलेल्या भारत राष्ट्र समिती (BRS) पक्षाने महाराष्ट्रात (Maharashtra) पाय रोवण्यास सुरुवात केली आहे. बीआरएसने राष्ट्रवादीतील (NCP) नाराजांना जवळ करण्यास सुरूवात केली आहे. सोलापूर (Solapur) जिल्ह्यात लवकरच मोठा राजकीय भूकंप होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील पवारांचा एक विश्वासू भिडू बीआरएसच्या वाटेवर आहे. आषाढी एकादशीला राजकीय भूकंप होणार आहे. (Bhagirath Bhalke news)
तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (CM KCR) यांनी भारत राष्ट्र समिती या पक्षाचा देशभर विस्तार होती घेतला आहे.महाराष्ट्रातही त्यांनी जोरदार लक्ष घातलं आहे. मराठवाड्यात त्यांच्या अनेक सभा झाल्या आहेत. नागपुरात (Nagpur) बीआरएस पक्षाचं कार्यालय उघडण्यात आलं आहे.बीआरएस पक्षात काही दिवसांपुर्वी अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनःशाम शेलार यांनी प्रवेश करत राजकीय खळबळ उडवून दिली होती. आता सोलापूर जिल्ह्यात राजकीय भूकंप होणार आहे.
आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर पंढरपूर (Pandharpur) विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे युवा नेते भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) हे राष्ट्रवादीला रामराम ठोकून बीआरएस पक्षात प्रवेश करणार आहेत. याबाबतची घोषणा त्यांनी नुकतीच कार्यकर्त्यांच्या बैठकीत केली आहे.भालके यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलारआहे.भगीरथ भालके हे स्वर्गीय माजी आमदार भारत भालके (Bharat Bhalke) यांचे सुपुत्र आहेत. स्व. भारत भालके यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली होती, त्यात त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर पक्षाने त्याना हवी ती राजकीय ताकद दिली नाही. त्यांच्या संस्थांची अनेक कामे सरकार दरबारी मार्गी नाही. राष्ट्रवादीने अभिजित पाटलांना (Abhijit Patil) झुकते माप देण्यास सुरू केली. तेथूनच भगीरथ भालके पक्षावर नाराज होते. (Bhagirath Bhalke latest news)
राष्ट्रवादीत नाराज असलेल्या भगीरथ भालके (Bhagirath Bhalke BRS) यांना बीआरएस पक्षात घेण्यासाठी केसीआर (KCR) यांनी मोठी फिल्डींग लावली होती.भालके यांना हैद्राबादला (Hyderabad) नेण्यासाठी केसीआर यांनी विशेष विमानाची व्यवस्था केली होती. तेव्हापासून भालके राष्ट्रवादीला रामराम ठोकणार अशी चर्चा होती, अखेर या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.भगीरथ भालके यांनी बीआरएस पक्षात प्रवेश करणार असल्याची घोषणा केल्याने राष्ट्रवादीत खळबळ उडाली आहे. येत्या आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर भालके हे आपल्या हजारो समर्थकांसह बीआरएस पक्षात प्रवेश करणार आहेत.
आषाढी एकादशीनिमित्त तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे पंढरपूर येथे श्री विठ्ठलाच्या दर्शनाला येणार आहेत. त्यांच्या समवेत अनेक मंत्री असणार आहेत. दर्शनानंतर भगीरथ भालके यांच्या पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडणार आहे. भालके यांच्या माध्यमांतून बीआरएस पश्चिम महाराष्ट्र (Paschim Maharashtra News) शिरकाव करणार आहे. भालके यांच्यासह राज्यातील आणखीन कोणते नेते बीआरएस पक्षात प्रवेश करणार याकडे आता राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.