जामखेड टाइम्स वृत्तसेवा । छत्रपती संभाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता सईबाई भोसले यांच्या स्मृती दिनानिमित्त जामखेड तालुक्यातील जवळा येथे रविवारी एकदिवसीय इतिहास अभ्यास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती शिवस्फुर्ती समुहाचे कार्याध्यक्ष अशोक पठाडे यांनी दिली.
छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास तरूण पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी शिवस्फुर्ती समुह आणि छत्रपती संभाजी महाराज सेवा समितीच्या वतीने राजमाता सईबाई भोसले यांच्या स्मृती दिनानिमित्त जवळा येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात एक दिवशीय इतिहास अभ्यास शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरासाठी प्रसिध्द इतिहासाचार्य डाॅ अनंत दारवटकर तसेच प्रसिद्ध व्याख्याते संदीप कदम यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
स्वराज्य रक्षक संभाजी महाराज या विषयावर इतिहास अभ्यास शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी सकाळी 10 ते 4 या वेळेत हे शिबीर संपन्न होणार आहे. या शिबिरासाठी तरूणांनी मोठ्या संख्येंने उपस्थित राहण्याचे अवाहन शिवस्फुर्ती समुहाचे कार्याध्यक्ष अशोक पठाडे यांनी केले आहे.