सरपंच प्रशांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर आणि ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली पठाडे यांच्या जाहिर हरि किर्तनाचे आयोजन
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। आपल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी नेहमी चर्चेत असलेले जामखेड तालुक्यातील जवळा गावचे सरपंच तथा आमदार रोहित पवार यांंचे खंदे शिलेदार प्रशांत (भाऊ) शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रशांत भाऊ शिंदे युवा मंचच्या वतीने भरगच्च सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
जामखेड तालुक्याच्या राजकारणात जवळा गावाची नेहमी महत्वपूर्ण अशी निर्णायक भूमिका राहिलेली आहे. कारण, या गावातून निर्माण झालेले राजकीय नेतृत्व हे होय, आजवर जवळा गावातून अनेक महत्वाचे दिग्गज नेते उदयास आले. त्यांनी आपल्या कार्याच्या बळावर तालुक्याच्या राजकारणात ठसा उमटवला. अनेक युवा नेते जवळा गावाने जामखेड तालुक्याच्या राजकारणाला दिले. यातील महत्वाचे नाव म्हणजे जवळा गावचे विद्यमान सरपंच प्रशांत शिंदे हे होय !
आपले गाव विकासाच्या बाबतीत स्वयंपूर्ण असावे, गावाला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी सुशिक्षित तरूणांनी राजकारणात यायला हवे, अशी भाकड चर्चा न करता थेट इंजिनिअर असलेल्या प्रशांत शिंदे यांनी लाखो रूपये पगाराची नोकरी सोडत राजकारणात प्रवेश केला. राजकारणात आल्यापासुुन त्यांनी जवळा गावात सतत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आपल्या कामांचा वेगळा ठसा उमटवला.
त्यानंतर जवळा ग्रामस्थांनी त्यांच्या खांद्यावर जवळा गावाच्या सरपंचपदाची ‘धुरा’ सोपवली. तेव्हापासून प्रशांत शिंदे हे युवा ‘नेतृत्व’ जामखेड तालुक्याच्या राजकारणात उदयास आले. प्रशांत शिंदे हे जामखेड तालुक्यातील महत्वाचे युवा नेत्यांपैकी सर्वात अश्वासक युवा नेते आहेत. शांत, संयमी, अभ्यासू लोकप्रिय युवा नेते म्हणून त्यांनी तालुक्याच्या राजकारणात नवी ओळख प्रस्थापित केली आहे.
जवळा गावचे सरपंच प्रशांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रशांत शिंदे युवा मंचच्या वतीने 24 डिसेंबर 2022 रोजी जवळा ग्रामपंचायत कार्यालयात मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या उपक्रमाचे आयोजन एच व्ही देसाई नेत्र रुग्णालय, हडपसर यांच्यावतीने करण्यात आले आहे. या शिबिराचा जवळा आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा,असे अवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
तसेच सोमवार दि 26 डिसेंबर 2022 रोजी जवळा येथील प्राथमिक शाळेत रात्री 8 वाजता महाराष्ट्रातील लोकप्रिय युवा किर्तनकार, विनोदाचार्य ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली पठाडे यांच्या जाहीर हरी किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा जवळा ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे अवाहन प्रशांत शिंदे युवा मंचच्या वतीने करण्यात आले आहे.
वरिल दोन्ही कार्यक्रमांसाठी सावता ग्रुप, राजे ग्रुप, सिध्दार्थ ग्रुप, समता ग्रुप, मौलाना आझाद ग्रुप, गजराज ग्रुप, राजमाता अहिल्याबाई होळकर मित्र मंडळ, जय भवानी मित्र मंडळ, गजराज मित्र मंडळ यांचे सहकार्य लाभणार आहे.