Ahmednagar-Sambajinagar highway accident : अहमदनगर-संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात, कंटनेरच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू !
Ahmednagar-Sambajinagar highway Accident : अहमदनगर-संभाजीनगर महामार्गावरील पांढरीपुल परिसरातून भीषण अपघाताची मन सुन्न करणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.भरधाव कंटनेरने दुचाकीला धडक दिली.या घटनेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोघा चिमुकल्यांचा समावेश आहे. ही घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली.
पारनेर तालुक्यातील वडगाव सातवाळ येथील रहिवासी असलेले पवार कुटूंबिय रविवारी कामानिमित्त बाहेर गेले होते. तेथून घरी परतत असताना पांढरीपुल परिसरात आल्यानंतर त्यांच्या स्कुटीला पाठीमागून येणाऱ्या भरधाव कंटनेरने जोराची धडक दिली. या भीषण अपघातात पवार कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला.मृतांमध्ये दोन चिमुकल्यांचा समावेश आहे.
या भीषण अपघातात अनिल बाळासाहेब पवार (वय २८), सोनाली अनिल पवार (वय २२), माऊली अनिल पवार (वय ११), अशी मृतांची नावे आहेत. (Anil Balasaheb Pawar, Sonali Anil Pawar, Mauli Anil Pawar) याशिवाय सहा महिन्यांच्या चिमुकलीचा देखील अपघातात मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या दुचाकीवरील भगवान आव्हाड हे जखमी झाले आहेत. अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.नागरिकांचा रोष पाहताच कंटेनर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. (Latest Marathi News)
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले. गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर-संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात होत आहेत. शुक्रवार (२६ जानेवारी) देखील महामार्गावर झालेल्या अपघातात सहाजण जखमी झाल्याची घटना घडली होती. पवार कुटुंबातील चौघांचा कंटनेरच्या धडकेत मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.