कर्जत नगरपंचायतसाठी मंगळवारी मतदान, प्रशासन सज्ज !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । कर्जत नगरपंचायतीच्या दुसर्‍या टप्प्यातील प्रचार थंडावला असून चार प्रभागासाठी मंगळवार, दि 18 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. (Polling for Karjat Nagar Panchayat on Tuesday)

कर्जत नगरपंचायत निवडणुकीत मंगळवारी होणार्‍या निवडणुकीसाठी पाच मतदान केंद्राची स्थापना करण्यात आली असून सर्वसामान्य मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क निर्भीडपणे बजवावा असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांनी केले आहे.यावेळी तहसीलदार नानासाहेब आगळे, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव उपस्थित होते.

कर्जत नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम सुरू असून पहिल्या टप्प्यात १३ जागेसाठी दि २१ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली होती. ओबीसी आरक्षणामुळे प्रलंबित असलेल्या उर्वरित चार प्रभागासाठी उद्या मंगळवार, दि १८ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे.

सोमवारी दुपारी १२ वाजता चार प्रभागासाठी ५ मतदान केंद्रावर मतदान पार पाडण्यासाठी नियुक्त केलेल्या कर्मचार्यांना आवश्यक साधनसामुग्रीसह रवाना करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ अजित थोरबोले यांनी दिली. चार प्रभागातील सर्वसामान्य मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क निर्भीडपणे पार पाडावा असे आवाहन डॉ थोरबोले यांनी केले.

प्रभाग क्रमांक आणि मतदान केंद्र पुढीलप्रमाणे

  1. प्रभाग क्रमांक १ गायकरवाडी – जिल्हा परिषद शाळा गायकरवाडी
  2. प्रभाग क्रमांक ३ ढेरेमळा – १) जिल्हा परिषद शाळा ढेरेमळा खोली क्रमांक १
    २) जिल्हा परिषद शाळा ढेरेमळा खोली क्रमांक ३
  3. प्रभाग क्रमांक ५ पोस्ट ऑफिस परिसर – अमरनाथ विद्यालय – कर्जत
  4. प्रभाग क्रमांक ७ बुवासाहेब नगर – दादा पाटील महाविद्यालय