जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। अंगी प्रचंड जिद्द आणि कठोर मेहनत करण्याची तयारी असेल तर कुठलेही यश सहज आपल्या मुठीत करता येऊ शकते, असेच एक उदाहरण कर्जत तालुक्यातून समोर आले आहे.
कर्जत तालुक्यातील चापडगाव हे अहमदनगर- सोलापुर हायवे वरील महत्वाचे गाव आहे. या गावची सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणाने राज्यात चर्चा होत असते. याला कारण ठरतायेत या गावातील विद्यार्थी. चापडगाव मधील विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रातील आपल्या यशस्वी कामगिरीने चापडगावचे नाव गाजवत आहेत.
गावपुढाऱ्यांनो लागा तयारीला.. आता थेट जनतेतून गावकारभारी निवडला जाणार
ग्रामीण भागातील विद्यार्थी CA ( चार्टर्ड अकाऊंटट) च्या परीक्षेकडे सहसा वळत नाहीत. अतिशय अवघड असलेल्या या परीक्षेसाठी चापडगावमधील प्राजक्ता महादेव निंबाळकर ही तरूणी बसली होती. या परिक्षेत ती उत्तीर्ण झाली आहे. (Prajakta Nimbalkar achieves resounding success in CA exam)
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : बाजार समिती निवडणुकीबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय
प्राजक्ता ही महादेव मारुती निंबाळकर यांची जेष्ठ कन्या आहे. चापडगावचे विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात अग्रेसर आहेत. मात्र CA ही अत्यंत खडतर परिक्षा उत्तीर्ण झालेली प्राजक्ता ही चापडगावमधील पहिलीच व्यक्ती ठरली आहे. चापडगावचे विद्यार्थी कर्तृत्वाच्या जोरावर वेगवेगळी क्षेत्र पादाक्रांत करत आहेत.
बिग ब्रेकिंग : राज्यातील नगरपरिषद निवडणूका लांबणीवर, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
खेड्यातील पार्श्वभुमी, आर्थिक अडचणी यावर मात करुन प्राजक्ताने या परिक्षेत संपादीत केलेले यश प्रत्येक चापडगावकरासाठी अभिमानास्पद बाब आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी कोणताही न्यूनगंड न बाळगता जिद्दीने प्रयत्न केल्यास कोणत्याही क्षेत्रात यश मिळवता येऊ शकते हे प्राजक्ताच्या निवडीने सिद्ध झाले आहे. चापडगावकरांच्या वतीने प्राजक्तावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.