Prathamesh Katte scam | फटे नंतर कट्टेचा घोटाळा उघडकीस, पैसे दुप्पट करण्याच्या बहाण्याने अनेकांची फसवणूक, पंढरपुरात उडालीय मोठी खळबळ
सोलापुर, पंढरपूर : Prathamesh Katte scam |राज्यात गाजत असलेल्या विशाल फटे (Vishal Phate scam barshi) घोटाळ्यानंतर सोलापुर जिल्ह्यात (Solapur) आणखी एक आर्थिक फसवणूकीचा घोटाळा उघडकीस आला आहे. पंढरपूरमधून (Pandharpur) हा आर्थिक फसवणूकीच घोटाळा (Financial fraud scam) घडकीस आला आहे.
बार्शीच्या विशाल फटे घोटाळ्यात ज्या पध्दतीने दामदुप्पटीचे आमिष दाखवले जात होते. तसेच आमिष पंढरपूरमध्ये दाखवले जात होते. सोलापुर जिल्ह्यात आर्थिक फसवणूकीचे रॅकेट सक्रीय असल्याचेच आता स्पष्ट होऊ लागले आहे. या रॅकेटचा पर्दाफाश होऊन दोषींवर कठोर कारवाई होणार का ? याकडे सोलापुरकरांचे लक्ष लागले आहे. (Prathamesh Katte scam)
सोलापुर जिल्ह्यातील पंढरपूर शहरात दाम दुप्पट आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी पहिला गुन्हा दाखल झाल्याने पंढरपुरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात 15 लाखाच्या फसवणूक प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. (Prathamesh Katte scam)
पंढरपूर येथील प्रथमेश कट्टे हा संकल्प पतसंस्थेचा (Sankalp Pathasanstha) चेअरमन आहे. आमच्या पतसंस्थेत गुंतवणूक करा, सहा महिन्यात पैसे डबल देतो, असे आमिष दाखवले. त्यामुळे त्याच्याकडे पंढरपूरमधील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी गुंतवणूक केली. परंतु, सहा महिने झाल्यानंतर पैसे देण्यास कट्टे टाळाटाळ करू लागला. (Prathamesh Katte scam)
त्यामुळे पंढरपूर येथील सुनील भिसे यांनी कट्टे आणि त्याचा साथीदार शुभम खोडके ( Shubham Khodake) याच्याविरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून शहर पोलीस ठाण्यात कट्टे आणि खोडके यांच्याविरोधात आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. (Prathamesh Katte scam)
सुनील भिसे (Sunil Bhise) यांनी 9 सप्टेंबर 2019 रोजी संकल्प पथसंस्थेत 15 लाख रूपयांची गुंतवणूक केली. मार्च 2020 मध्ये सहा महिने पूर्ण झाल्यानंतर भिसे यांनी कट्टे याच्याकडे पैशांची मागणी केली. त्यावेळी कट्टे हा पैसे देण्यास टाळाटाळ करू लागला. त्यामुळे भिसे यांनी कट्टे आणि खोडके यांच्या विरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली.
पंढरपूर शहरात अनेकांची फसवणूक झाल्याचे या प्रकरणातून पुढे येण्याची शक्यता आहे. परंतु, अनेक जण अद्याप तक्रार देण्यास पुढे आले नाहीत. ज्या लोकांनी या पथसंस्थेत पैशांची गुंतवणूक केली आहे, परंतु, पैसे परत मिळाले नाहीत त्यांनी तक्रार द्यावी असे आवाहन पंढरपूर शहर पोलिसांनी केले आहे.
दरम्यान, सोलापूर जिल्ह्यात दोन महिन्यात कोट्यवधी रूपयांची फसवणूक होण्याची ही दुसरी घटना आहे. बार्शी येथील विशाल फटे यानेही अनेकांना दुप्पट पैसे देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रूपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. सध्या तो तुरूंगात असून आता ही दुसरी घटना समोर आल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीती निर्माण झाली आहे.(Prathamesh Katte scam)