Big Update On Bopdev Ghat Gang rape Case Pune :बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणात मोठी अपडेट; पुणे पोलिसांच्या हाती लागले CCTV फुटेज, त्यात नेमकं काय ? वाचा

Big Update On Bopdev Ghat Gang rape Case Pune : पुण्यातील एका २१ वर्षीय तरुणीवर बोपदेव घाटात कोयत्याचा धाक दाखवून सामुहिक बलात्कार (Rape) करण्यात आला.ही खळबळजनक घटना शुक्रवारी उघडकीस आली. महाराष्ट्राला (maharashtra) हादरवून टाकणाऱ्या बोपदेव घाट गैंगरेप प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. पोलिसांनी आरोपींचे स्केच (Sketch of accused in Bopdev Ghat rape case) जारी केले आहेत. त्याचबरोबर आरोपींच्या मागावर असलेल्या पुणे पोलिसांच्या (Pune Police) हाती सीसीटीव्ही फुटेज (CCTV) लागले आहे. यात नेमकं काय दडलं आहे ? जाणून घेऊयात. (Pune Crime news today marathi)

Pune Bopdev Ghat latest news today, Big update on Bopdev Ghat gang rape case, Pune police got CCTV footage what exactly is in it?,

बोपदेव घाटात रात्रीच्या वेळी एका तरूणीवर गैंगरेप झाल्याचे समोर येताच पुण्यात मोठी खळबळ उडाली. पुणे पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने गुन्हा दाखल करून घेतला. या प्रकरणातील आरोपींच्या शोधासाठी अनेक पथके रवाना केली. या प्रकरणाचा तांत्रिक तपास पोलिसांनी वेगाने हाती घेतला. वेगवेगळे सीसीटीव्ही फुटेज, लाईव्ह लोकेशन शोधण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले. ज्या भागात लैंगिक अत्याचाराची घटना घडली तो भाग डोंगराळ आहे.त्या भागात मोबाईलला फारसी रेंज नसते. घटनास्थळापासून दहा ते पंधरा किलोमीटरच्या परिसरात कोठेच सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. हा निर्जन परिसर आहे. त्यामुळे तपासात अडथळा येत आहे. (Big Update On Bopdev Ghat Gang rape Case Pune)

Big Update On Bopdev Ghat Gang rape Case Pune : पुणे पोलिसांच्या हाती लागले सीसीटीव्ही फुटेज

परंतू पुणे पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकाने आपले सर्व कौशल्य पणाला लावत एका ठिकाणाहून सीसीटीव्ही फुटेज मिळवण्यात मोठे यश मिळवले आहे. सासवड परिसरातील एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये तिघे संशयित आरोपी उभे असलेले दिसत आहेत. १ वाजून ३६ मिनिटांनी तिघे संशयित आरोपी या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालेत.सामूहिक बलात्काराची ही घटना 11 ते 12 च्या मध्ये घडली आहे. त्यामुळेच या मुलीवर अत्याचार केल्या नंतर हे आरोपी सीसीटीव्ही मध्ये दिसणाऱ्या ठिकाणी जाऊन थांबले असावेत असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे यानंतर हे आरोपी कुठे गेले याचा तपास करण्यासाठी शेकडो सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. (Big Update On Bopdev Ghat Gangrape Case Pune)

पोलिसांना प्राप्त झालेल्या या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक आरोपी हा तोंडाला कापड बांधत असलेला दिसून येत आहे. त्याने कदाचित अत्याचार करतेवेळीही चेहरा झाकला असेल. त्यामुळेच पीडित तरुणी आणि तिच्या मित्राने केलेल्या वर्णनावरून दोन आरोपींचे स्केच पोलिसांनी काढून घेतले आहेत. त्या आधारे या आरोपींचा शोध सुरू असून पोलिसांची तब्बल २५ पथकं आरोपींच्या मागावर आहेत. (Big Update On Bopdev Ghat Gang rape Case Pune)

बोपदेव घाटात तरूणीसोबत नेमकं काय घडलं ?

पुण्यात महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेली सुरत येथील एक २१ वर्षीय तरूणी आपल्या  मित्रासमवेत बोपदेव घाटात फिरायला गेले होते.  तिचा मित्र जळगावचा रहिवासी आहे. हे दोघे रात्रीच्या सुमारास बोपदेव घाटात दुचाकीवरून फिरायला गेले होते. टेबल पाँईट परिसरात तिघा नराधमांनी दोघांना गाठले. यावेळी पिडीत तरूणीच्या मित्राला बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याला शर्ट व बेल्टने बांधून डांबून ठेवण्यात आले. (Big Update On Bopdev Ghat Gang rape Case Pune)

त्यानंतर आरोपींनी तरूणीला पोलिस मदत केंद्राच्या मागे असलेल्या डोंगरावर नेत तिच्यावर सामुहिक लैंगिक अत्याचार (गैंगरेप) केला. त्यानंतर आरोपी घटनास्थळाहून पसार झाले. त्यानंतर पिडीत तरूणीने बांधुन ठेवलेल्या आपल्या मित्राला सोडवले. त्यानंतर दोघांनी उपचारासाठी हाॅस्पीटल गाठले. पिडीत तरूणी पुण्यात इव्हेंट मॅनेजमेंटचे शिक्षण घेत आहे, तर तिचा मित्र सीएची तयारी करत आहे.

कोयत्याचा धाक, जीवे मारण्याची धमकी आणि बलात्कार

बोपदेव घाटात रात्रीच्या वेळी मित्रासमवेत फिरायला गेलेल्या तरुणीवर सामुहिक बलात्कार करणाऱ्या आरोपींनी दोघांना कोयत्याचा धाक दाखवला. दोघांकडील मौल्यवान वस्तु काढून घेतल्या. त्यानंतर पिडीतेच्या मित्राला ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तरूणीवर तिघा नराधमांनी सामुहिक बलात्कार केला. (Big Update On Bopdev Ghat Gang rape Case Pune)

पुणे पोलिसांकडून आरोपींचे रेखाचित्र जारी

https://www.jamkhedtimes.com/maharashtra/west-maharashtra/bopdev-ghat-news-21-year-old-girl-who-went-for-walk-with-friend-was-gang-raped-the-incident-of-gang-rape-created-excitement-in-pune-what-exactly-happened-at-bopdev-ghat-read-in-detail/

बोपदेव घाट सामुहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींच्या शोधासाठी पोलिसांकडून वेगाने तपास केला जात आहे. पिडीत तरूणी व तिच्या मित्राच्या मदतीने पोलिसांनी संशयित आरोपींचे रेखाचित्र बनवले आहे. आरोपींचे रेखाचित्र पोलिसांनी जारी केले आहे. या रेखाचित्रावरून पोलिसांचा तपास सुरु आहे. रेखाचित्रातील इसमांना शोधण्यासाठी नागरिकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे. (Big Update On Bopdev Ghat Gang rape Case Pune)

बोपदेव घाट बलात्कार प्रकरणातील आरोपींची माहिती खालील नंबरवर द्यावी

आरोपींची माहिती मिळाल्यास खालील नंबर वर त्वरित संपर्क साधावा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंढवा पोलीस स्टेशन विनय पाटणकर मो नं 8691999689 पोलीस निरीक्षक  गुन्हे शाखा युनिट 5 युवराज हांडे मो नं. 8275200947 /9307545045 असे अवाहन करण्यात आले आहे.