Pune Crime News : पुण्यात चाललयं काय ? कोयता गँगनंतर अजून एका गँगची दहशत, कुऱ्हाड गँगने केली मिठाई दुकानाची तोडफोड, नागरिकांमध्ये पसरलीय घबराट !

पुणे : पुण्यात सातत्याने गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अनेक गुन्हेगारी टोळ्यांनी पुणे व परिसरात उच्छाद मांडला आहे. दिवसाढवळ्या तोडफोडीच्या घटना घडत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात कोयता गँगने उच्छाद मांडत दहशत निर्माण केली होती.आता पुण्यामध्ये आणखी एक नवी गँग सक्रीय झाली आहे.कोयता गँगनंतर कुऱ्हाड गँगने शहरात दहशत निर्माण केली आहे. यामुळे पुणेकरांमध्ये घबराट पसरली आहे.

Pune Crime News, What is going on in Pune? After Koyta gang, another gang terror, Kuhrad gang vandalized sweet shop, panic spread among citizens, pune latest news in marathi,

दोन दिवसांपुर्वी सदाशिव पेठेत एका विद्यार्थीनीवर कोयत्याने हल्ला करण्याची घटना ताजी असतानाच आता कुर्‍हाड गँगच्या कारनाम्याची घटना समोर आली आहे. पुण्याच्या शेवाळवाडी भागात कुऱ्हाड गँगने एका मिठाईच्या दुकानाची तोडफोड केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे मोठी दहशत पसरली आहे. ही घटना समोर येताच पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे.

http://jamkhedtimes.com/big-news-match-schedule-announced-for-icc-mens-cricket-world-cup-2023-india-vs-pakistan-first-match-on-this-day-world-cup-2023-schedule-cwc-latest-update/

पुण्याच्या शेवाळवाडी भागात एका मिठाई दुकानाची कुऱ्हाड गँगने तोडफोड करत दहशत निर्माण केली. ही घटना बुधवारी रात्री सातच्या सुमारास घडली. शेवाळवाडी फाटा येथील चैतन्य स्विट सेंटर या दुकानात घुसून तिघा जणांनी राडा केला. यावेळी हल्लेखोर कुऱ्हाड गँगच्या तिघांनी कुर्‍हाडीच्या सहाय्याने दुकानातील काचेची कपाटे, फ्रिजची तोडफोड केली. अचानक झालेल्या या हल्ल्याने परिसरात मोठी दहशत निर्माण झाली होती. या घटनेत दुकानदाराचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

पोलिस शिपाई विजयकुमार ढाकणे यांच्या सतर्कतेमुळे एक जण गजाआड

दरम्यान, साम टीव्हीच्या वृत्तानुसार, शेवाळवाडी चौकात ड्युटीवर असलेले पोलिस शिपाई विजयकुमार ढाकणे यांनी दुचाकीवरून सिनेस्टाईल पाठलाग करत तिघांपैकी एकाला पकडले.यावेळी ढाकणे यांनी मोटारसायकलवरून 7 किलोमीटर हल्लेखोरांचा पाठलाग केला.हल्लेखोरांची मोटारसायकलवर घरल्याने ते खाली पडले. यात दोघे जण पळून जाण्यात यशस्वी झाले. तर एकाला ढाकणे यांनी पकडले. या प्रकरणी हडपसर पोलिस स्टेशनला तिघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिस इतर दोघांचा वेगाने शोध घेत आहेत. पोलिसांनी एका विधिसंघर्षीत मुलाला ताब्यात घेत आहे.

पुणे व परिसरात सातत्याने गुन्हेगारी घटना घडत आहेत. या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कोयता गँग व कुऱ्हाड गँगचा कायमचा पोलिसांनी बिमोड करावा, अशी मागणी आता पुणेकरांमधून जोर धरू लागली आहे.

http://jamkhedtimes.com/big-news-big-decision-of-school-education-department-regarding-fifth-and-eighth-exams-education-commissioner-suraj-mandhare-ias/