Anil Ramod CBI raid : पुणे महसुल विभागातील IAS अधिकारी अनिल रामोड यांच्यावर CBI ची धाड, ऋतूपर्ण सोसायटीत चौकशी सुरू, सीबीआयच्या हाती लागले मोठे घबाड? महसुल विभागात उडाली मोठी खळबळ
पुणे : येथील महसुल विभागात कार्यरत असलेले अतिरिक्त महसुल विभागीय आयुक्त डाॅ अनिल गणपतराव रामोड (dr Anil Ramod IAS ) यांच्या पुण्यातील घरी सीबीआयने (CBI raid in pune) शुक्रवारी छापेमारी केली. त्याआधी सीबीआयने डाॅ अनिल रामोड (anil ramod) यांना 8 लाख रूपयांची लाच घेताना पकडले. त्यानंतर सीबीआयच्या पथकाने पुण्यातील विविध ठिकाणी धाडी टाकल्या. सीबीआयने हाती घेतलेल्या या कारवाईमुळे महसुल विभागात (Revenue Department Maharashtra) मोठी खळबळ उडाली आहे. CBI ने अनिल रामोड यांच्या पुण्यातील निवासस्थानी टाकलेल्या धाडीत सीबीआयच्या हाती मोठं घबाड लागल्याचे बोलले जात आहे.
महसुल विभागाच्या पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात गेल्या दोन वर्षांपासून अतिरिक्त महसुल विभागीय आयुक्त म्हणून कार्यरत असलेले अनिल रामोड यांच्या विधान भवनातील कार्यालय, क्वीन्स गार्डन येथील सरकारी निवासस्थान, बाणेर येथील ऋतूपर्ण सोसायटीतील घर (anil ramod hous Rituparna Society Baner Pune )अश्या तीन ठिकाणी सीबीआयने शुक्रवारी छापेमारी केली. सीबीआयने अनिल रामोड यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सीबीआयच्या हाती या छापेमारीत मोठे घबाड लागल्याचे बोलले जात आहे.अनिल रामोड यांच्याविरोधात लाचखोरीच्या तक्रारी आल्यानंतर सीबीआयने शुक्रवारी 9 रोजी कारवाई केली.
सीबीआयच्या पथकाने 9 जून 2023 रोजी दुपारी एकच्या सुमारास बाणेर येथील ऋतूपर्ण सोसायटीत छापेमारी केली. हा भाग उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाचा भाग आहे. सीबीआयच्या 10 ते 15 अधिकाऱ्यांच्या पथकाने ऋतूपर्ण सोसायटीतील ( सुरक्षा रक्षकांना न जुमानता सी विंगमधील अनिल रामोड यांच्या निवासस्थानावर धाड टाकली. यावेळी या पथकाने रामोड यांच्या घराचा ताबा घेत चौकशी सुरु केली आहे. पोलिसांनी पैसे मोजण्याचे दोन मशिन मागवले असल्याचेही बोलले जात आहे.
…म्हणून अतिरिक्त विभागीय आयुक्त अनिल रामोड यांच्यावर कारवाई
पुणे विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. अनिल रामोड यांना 8 लाखांची लाच घेताना सीबीआयने पकडले. पुणे विभागात पहिल्यांदाच आयएएस असलेल्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या जमिन भूसंपादनाचा मोबदला मान्य नसल्याने संबधित शेतकरी यांनी याविरुध्द अतिरिक्त आयुक्त रामोड यांच्याकडे दाद मागितली होती. यावर अपिल सुरु होते. भूसंपादन मोबदल्याचे अपिल मान्य करण्यासाठी तक्रार यांच्याकडे आठ लाख रुपयांची लाच मागण्यात आली होती. याप्रकरणी तक्रारदार यांनी सीबीआयकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार शुक्रवारी रामोड यांनी कार्यालयात लाच घेताना सीबीआयने रंगेहाथ पकडले. दुपारी साडेबारा वाजता सुरु झालेली कारवाई सायंकाळी साडेपाच वाजता पूर्ण झाली. त्यानंतर सीबीआयच्या पथकाने रामोड यांना ताब्यात घेतले.
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या जमिनीचे संपादन महामार्गासाठी करण्यात येणार होते.त्यापोटी भूसंपादनाचा दर संबंधित शेतकऱ्याला मान्य नसल्याने त्यांनी याप्रकरणी पुणे विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ.रामोड यांच्याकडे अपिल दाखल केले होते. भूसंपादनाच्या प्रकरणात न्यायनिवाडा करण्यासाठी शासनाने लवाद म्हणून रामोड यांची नियुक्ती केली होती. त्यानुसार रामोड यांच्याकडे याप्रकरणी सुनावणी सुरु होती. अशी अनेक प्रकरणाची सुनावणी रामोड यांच्याकडे सुरु होती. माळशिरस येथील प्रकरणात ज्येष्ठ वकिलाकडे लाच मागण्यात आली. त्यामुळे याप्रकरणी या वकिलांनी सीबीआयकडे तक्रार दाखल केली होती.
या तक्रारीनुसार सीबीआयकडून मागील 15 दिवसांपासून माहिती गोळा करण्याचे काम सुरु होते. तक्रारीची शहानिशा झाल्यानंतर सीबीआयने शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास विधानभवन येथील अतिरिक्त आयुक्त यांच्या कार्यालयात रामोड याला लाच घेताना रंगेहाथ पकडले.सीबीआयची कारवाई झाल्याचे कळताच रामोड यांनी चक्कर आल्याचे नाटक केले. त्यानंतर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी रामोड यांना पाणी दिले. त्यानंतर याप्रकरणाची त्याच्याकडे चौकशी करण्यात आली. ही चौकशी तब्बल साडेपाच तास सुरु होती. यानंतर रामोड यांना सीबीआयने ताब्यात घेतले, त्यानंतर सीबीआयकडून विविध ठिकाणी छापेमारी करण्यात आली.
दरम्यान, महसुल विभागातील बड्या अधिकाऱ्यावर सीबीआयने अचानक धाड टाकल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. रामोड यांच्यावरील कारवाईत सीबीआयच्या हाती किती घबाड लागणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.