Ram Shinde News : जनतेला जे पाहिजे तेच करून दाखवणं, हाच आपल्या कामाचा फंडा – आमदार राम शिंदे, जामखेड प्रारूप विकास आराखडा बचाव कृति समितीने केला आमदार राम शिंदेंचा नागरी सत्कार !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : १४ ऑक्टोबर २०२४ : “मी विरोधकांसारख्या लोकांच्या नुसत्या मिटींगा घेत बसलो नाही, जामखेड शहरातील 427 लोकांनी डीपी प्लॅनला (Jamkhed DP plan) हरकती घेतल्या होत्या, लोकांनी सांगितलं हा अन्यायकारक डीपी प्लॅन आहे, मी एवढचं बघितलं आणि लोकांच्या आणि कृति समितीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलो. सरकारकडे दाद मागितली आणि सरकारने डिपी प्लॅन रद्द केला. जनतेला जे पाहिजे तेच करून दाखवलं, हाच आपल्या कामाचा फंडा आहे, असे प्रतिपादन आमदार प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांनी केले.”

ram shinde news, Jamkhed draft development plan defense committee awarded civil honor to MLA Ram Shinde, while responding to the honor, Ram Shinde fired cannon at the opponents,

कृति समितीच्या मागणीनुसार व आमदार प्रा राम शिंदे यांच्या मध्यस्थीने महायुती सरकारने अन्यायकारक जामखेड शहर विकास आराखडा रद्द केला.सरकारच्या या निर्णयामुळे जामखेड शहरातील व्यापारी व नागरिक तसेच जामखेड प्रारूप विकास आराखडा बचाव कृति समिती यांच्या वतीने आमदार प्रा राम शिंदे यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डिपी प्लॅन रद्द केल्याबद्दल जामखेड शहरातील विविध घटकातील नागरिकांनी व व्यापारी बांधवांनी आमदार राम शिंदे यांचा नागरी सत्कार करत आभार मानले. यावेळी सत्काराला उत्तर देताना आमदार शिंदे बोलत होते.

ram shinde news, Jamkhed draft development plan defense committee awarded civil honor to MLA Ram Shinde, while responding to the honor, Ram Shinde fired cannon at the opponents,

“डीपी प्लॅन संदर्भात विद्यमान आमदाराने अनेक मिटींगा घेतल्या, गावकऱ्यांना म्हणाले वर्गण्या करू नका, आम्ही वकिल देतो, भारी वकिल देतो, बारामतीच्या वकिलांची फौज उभी करू म्हणले, मग तुम्ही जी फौज उभी करणार होतात ती कुठे गेली ? कोणत्या कोर्टात पिटीशन दाखलयं ? कोणता डिपी प्लॅन चालुयं? जनतेवर अन्याय होत असताना विद्यमान आमदाराची फलटण कुठे गेली ? सर्वसामान्य जनतेचे घरं, दुकानं उजाडल्यावर पिटीशन दाखल करणार होते का ? असा जोरदार हल्लाबोल यावेळी शिंदे यांनी पवारांवर केला.”

ram shinde news, Jamkhed draft development plan defense committee awarded civil honor to MLA Ram Shinde, while responding to the honor, Ram Shinde fired cannon at the opponents,

“डीपी प्लॅनमुळे जामखेड शहरातल्या लोकांचं मोठं नुकसान होणार होतं, आपण जर बघितलं नाही तर हा अन्यायकारक विकास आराखडा मंजुर होईल, त्यात आपली सर्वसामान्य माणसं नाहक भरडली जातील आणि त्यात त्याचं खुप मोठं नुकसान होईल, ते होऊ नये यासाठी मी या गंभीर प्रश्नांवर सरकारकडे दाद मागितली. पण ज्यांनी नुसत्याच मिटींगा घेतल्या त्यांनी जनतेला दिलासा देण्यासाठी काहीच मार्ग काढला नाही, उलट ते गंडवागंडवी करत राहिले, असा टोला शिंदे यांनी लगावला.”

ram shinde news, Jamkhed draft development plan defense committee awarded civil honor to MLA Ram Shinde, while responding to the honor, Ram Shinde fired cannon at the opponents,

“मी मंत्री असताना शहर विकास आराखड्याचा विषय पुढे आला नाही, पण तो माझ्या पराभवानंतर पुढे आला, विकास आराखडा कोणाच्या काळात आला? कोणी एजन्सी दिली होती? कोणी हा प्रस्तावित केला ? कोणाच्या वेळोवेळी सुचना मिळाल्या ? विकास आराखडा बनवण्यासाठी बारामतीची एजन्सी कोणी नेमली, राज्यात दुसरी एजन्सी नव्हती का ? मी एजन्सी नेमली म्हणता तर मी बारामतीची एजन्सी कसा नेमेल ? असे सवाल करत आमदार राम शिंदे यांनी रोहित पवारांकडून सुरु असलेल्या बनवाबनवीचा जोरदार समाचार घेतला.”

ram shinde news, Jamkhed draft development plan defense committee awarded civil honor to MLA Ram Shinde, while responding to the honor, Ram Shinde fired cannon at the opponents,

प्रा मधुकर आबा राळेभात व कृति समितीने सांगितलं की, प्रस्तावित डीपी प्लॅन हा जनतेवर अन्याय अत्याचार करणारा आहे.त्यांच्या मागणीची तातडीने दखल घेऊन शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांना वस्तुस्थिती समजून सांगितली. कृति समितीने दिलेल्या निवेदनानुसार मुख्यमंत्र्यांनी डीपी प्लॅन रद्द करून नव्याने डीपी प्लॅन तयार करावा,असे आदेश दिले त्यानुसार प्रशासनाने डिपी प्लॅन रद्द बाबत आदेश काढले.

जनतेवर अन्याय अत्याचार करणाऱ्या डीपी प्लॅनची काही जण विद्यमान आमदाराच्या दबावाखाली येऊन भलामन करत आहेत, त्याला जामखेडची सुज्ञ जनता चोख उत्तर दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा विश्वास यावेळी आमदार राम शिंदे यांनी व्यक्त केला.

यावेळी पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, जामखेड ते सौताडा या रस्त्याचे काम खासदार सुजय विखे पाटील यांच्या माध्यमांतून मंजुर झाले.कामही सुरू झाले. पण काम सुरु असतानाच विद्यमान आमदाराने शहरात अनेक मिटींगा घेतल्या. यांची घरे जाणार, त्यांची बिल्डींग पडणार, याचा ओटा जाणार, त्यो मागं सरणार, याचं असचं होणार, त्याच तसचं होणार, अशी भिती अनेकांना दाखवली. पण त्यांना दिलासा देण्यासाठी काहीच केलं नाही.

ram shinde news, Jamkhed draft development plan defense committee awarded civil honor to MLA Ram Shinde, while responding to the honor, Ram Shinde fired cannon at the opponents,

पण मी आमदार झाल्यावर रस्त्याच्या विषयावर मी एकही मिटींग घेतली नाही. मला एक शिष्टमंडळ येऊन भेटलं, त्यांचं म्हणणं ऐकुन घेतलं, त्यांना भिती दाखवत बसलो नाही, तर संबंधित एजन्सीला सांगुन टाकलं, तुला जेवढं सांगितलयं तेवढं करून टाक, जेव्हा केव्हा पुढे प्रश्न निर्माण होईल तेव्हा आम्ही बघून घेऊ, लोकं उठवायचं काम नाही, आम्ही रस्ते बाहेरून काढू, आम्ही इथले आहोत, आम्हाला कळतो काय प्रश्न आहे तो, त्यामुळे कोणाला कसलाच धक्का लागला नाही, रस्त्याचे काम सुरु राहिलं आणि तो प्रश्न मिटला.

ram shinde news, Jamkhed draft development plan defense committee awarded civil honor to MLA Ram Shinde, while responding to the honor, Ram Shinde fired cannon at the opponents,

यावेळी कृति समितीचे अध्यक्ष प्रा मधुकर आबा राळेभात, डाॅ माजी सभापती भगवान मुरूमकर,  रविंद्र सुरवसे, अशोक खेडकर, शरद कार्ले, संजय काशिद, पवनराजे राळेभात, अमित चिंतामणी, अमित जाधव, मोहन पवार, बाजीराव गोपाळघरे, राहुल उगले, अकाश बाफना, विनायक राऊत, जमीर बारूद, महालिंग कोरे, सह आदी यावेळी उपस्थित होते.

ram shinde news, Jamkhed draft development plan defense committee awarded civil honor to MLA Ram Shinde, while responding to the honor, Ram Shinde fired cannon at the opponents,

“जामखेड शहराचा प्रारूप विकास आराखडा शहरातील जनतेवर अन्याय व अत्याचार करणारा असून हा विकास आराखडा हुकुमशाही पद्धतीने तयार करण्यात आला असल्याने याविरोधात जामखेड प्रारूप विकास आराखडा बचाव कृति समितीची स्थापना करण्यात आली होती. सदरचा विकास आराखडा रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी समितीने धरणे अंदोलन व जामखेड बंदचे अंदोलन केले होते.

ram shinde news, Jamkhed draft development plan defense committee awarded civil honor to MLA Ram Shinde, while responding to the honor, Ram Shinde fired cannon at the opponents,

त्याचबरोबर या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी आमदार प्रा राम शिंदे यांच्या मध्यस्थीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दाद मागितली होती. यावेळी कृति समितीने दिलेल्या निवेदनावर मुख्यमंत्र्यांनी ‘अ’ बाबत तात्काळ प्रस्तावित करावे असे प्रधान सचिवांना आदेश दिले होते. त्यानुसार नगरविकास विभागाने डीपी प्लॅन रद्द केला. या निर्णयामुळे शहरातील जनतेत आनंदाचे वातावरण आहे.”