गायरान क्षेत्रावरील खासगी आस्थापनांसह व्यापारी संकुलांबाबत महसुलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे मोठे वक्तव्य
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । राज्यातील गायरान जमिनींवरील अतिक्रमणांचा चांगलाच तापला आहे. गायरान जमिनींवरील अतिक्रमण धारक कुटुंबांना सरकारकडून दिलासा दिला जाईल असे वक्तव्य वनमंत्री सुधीर मुनगुंटीवर यांनी केलेले असतानाच राज्याचे महसुल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी अहमदनगरमध्ये एक महत्वाचे वक्तव्य केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने सन 2011 मध्ये दिलेल्या आदेशानुसार शासनामार्फत काम करण्यात येत आहे. गायरान क्षेत्रामध्ये झालेल्या अतिक्रमणामध्ये अनुसूचित जाती, जमाती, भूमिहिन तसेच प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गतच्या लाभार्थ्यांची प्रकरणे नियमानाकूल करण्यात येत आहेत.
परंतू, गायरान क्षेत्रावर खासगी आस्थापना अथवा व्यापारी संकुलाची उभारणी झाली असेल तर अशांवर कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी अहमदनगरमध्ये बोलताना दिली.
यावेळी बोलताना विखे पाटील म्हणाले की, सद्यस्थितीमध्ये ज्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत, त्यावर कुठलीही कारवाई न करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.