Rohit Pawar saffron politics in Karjat Jamkhed ?| कर्जत – जामखेडमध्ये रोहित पवारांचे ‘भगवे’ पाॅलिटिक्स ?

रोहित पवारांच्या पुढाकारातून खर्ड्यात साकारणार भारतातील सर्वात उंच भगवा स्वराज्य ध्वज !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा|[सत्तार शेख] । Rohit Pawar saffron politics in Karjat Jamkhed? : मराठ्यांच्या शेवटच्या ऐतिहासिक विजयी लढाईचा साक्षीदार असलेल्या जामखेड तालुक्यातील खर्डा भुईकोट किल्ल्यासंबंधी आमदार रोहित पवार यांनी सोमवारी महत्वपूर्ण घोषणा केली आहे.खर्डा किल्ल्याच्या आवारात ७४ मीटर उंच भगवा स्वराज्य ध्वज लावला जाणार आहे.

रोहित पवारांच्या या घोषणेमुळे कर्जत – जामखेड मतदारसंघातून राष्ट्रवादीने राज्यात भगव्या पाॅलिटिक्सला प्रारंभ केल्याचे आता बोलले जाऊ लागले आहे. (Due to this announcement of Rohit Pawar, it is being said that NCP has started saffron politics in the state from Karjat Jamkhed constituency.)

मागील काही निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीची सातत्याने पिछेहाट होत आहे. अगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांचे गणिते डोळ्यासमोर ठेवत राष्ट्रवादीने रणनिती आखण्यास प्रारंभ केला आहे. त्यासाठी जनाधार वाढवण्याबरोबरच तुटलेला जनाधार पुन्हा जोडण्यासाठी राष्ट्रवादीकडून नव्या खेड्या खेळण्यास प्रारंभ झाला आहे. (Rohit Pawar saffron politics in Karjat Jamkhed?)

Rohit Pawar saffron politics in Karjat Jamkhed

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य निर्मितीत ज्या भगव्या स्वराज्य ध्वजाची पताका हाती घेऊन, बहूजन समाजाची वज्रमूठ बांधत अलौकिक शौर्य गाजवून स्वराज्य निर्माण केले होते त्याच स्वराज्य ध्वजाचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आता आमदार रोहित पवार पर्यायाने राष्ट्रवादी सरसावली आहे. ऐरवी भगवा ध्वज म्हटलं की शिवसेना भाजप हे दोन पक्ष किंवा हिंदुत्ववादी संघटना नजरेसमोर येतात. परंतु आता राष्ट्रवादीनेही भगव्या ध्वजाचे नवे राजकारण हाती घेतले आहे असे बोलले जात आहे. राष्ट्रवादीच्या या नव्या भूमिकेचे बहूजन समाजात काय पडसाद उमटणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. (Rohit Pawar saffron politics in Karjat Jamkhed?)

Rohit Pawar saffron politics in Karjat Jamkhed

राष्ट्रवादीकडून पर्यायाने आमदार रोहित पवारांनी भारतातील सर्वात उंच भगवा स्वराज्य ध्वज साकारण्यासाठी मराठ्यांच्या शेवटच्या विजयाचा साक्षीदार असलेल्या खर्डा किल्ल्याची निवड करत महाराष्ट्राचे लक्ष खर्डा किल्ल्याकडे वेधले आहे. याशिवाय विखुरलेल्या मराठा समाजाला एकगठ्ठा राष्ट्रवादीकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न यानिमित्ताने केला गेला आहे का ? अशी शंका आता राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.

काय आहे आमदार रोहित पवारांची योजना ?

ऐतिहासिक खर्डा येथे भुईकोट किल्ला आहे. या किल्ल्याच्या आवारात आवारात शौर्य आणि एकतेचं प्रतीक म्हणून ७४ मीटर उंचीचा भगवा स्वराज्य ध्वज उभारला जाणार आहे. हा भारतातील सर्वात उंच ध्वज असणार आहे. भगव्या स्वराज्य ध्वजाचं संत-महंतांच्या हस्ते नुकते पूजन करण्यात आलं आहे. आता पुढील दोन महिने हा ध्वज देशातील ७४ अध्यात्मिक व धार्मिक स्थळी, संतपीठांच्या ठिकाणी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ल्यांवर हा ध्वज नेण्यात येणार आहे. तिथं पूजन केल्यानंतर शेवटी पंढरपूरच्या विठुरायाच्या अंगणात या ध्वजाची पूजा करून १५ ऑक्टोबर रोजी तो मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत खर्ड्याच्या किल्ल्यात अभिमानाने फडकविण्यात येणार आहे. (Rohit Pawar saffron politics in Karjat Jamkhed?)

रोहित पवारांची भूमिका काय ?

आमदार रोहित पवार म्हणाले की हा भगवा रंगाचा स्वराज्य ध्वज कोणा एकाचा नसून तो सर्वांचा आहे आणि या ध्वजाच्या माध्यमांतून कर्जत-जामखेड मतदारसंघाला नवी ओळख मिळवून देण्याचा माझा प्रयत्न आहे.हा ध्वज जगभरातील पर्यटकांचं आकर्षण ठरणारच पण सामर्थ्य, धैर्य, शक्ती, भक्ती, प्रगती याचं प्रतीक ठरेल आणि डौलाने फडकत राहील, असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान आपली सविस्तर भूमिका असलेला एक व्हिडिओ रोहित पवारांनी सोशल मिडीयावर शेअर केला आहे. ( Rohit Pawar saffron politics in Karjat Jamkhed ?)