Bhaskar More : जामखेडच्या अंदोलनाची राज्य महिला आयोगाने घेतली दखल, आयोगाने पोलिसांना दिले महत्वाचे निर्देश
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । Bhaskar More Jamkhed News Today : रत्नदीप मेडिकल फौंडेशन अँड रिसर्च सेंटरचे संस्थापक डाॅ भास्कर मोरेंविरोधात रत्नदीप शैक्षणिक संकुलातील शेकडो विद्यार्थ्यांनी गेल्या सात दिवसांपासून तीव्र अंदोलन हाती घेतले आहे. जामखेडमध्ये सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या या अंदोलनाची राज्य महिला आयोगाने (State Commission for Women) दखल घेतली आहे. आयोगाने अहमदनगरचे जिल्हा पोलिस अधीक्षक यांना पत्र लिहिले आहे. याद्वारे महिला आयोगाने पोलिसांना महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. याबाबतची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांनी सोशल मीडियावर जारी केली आहे. (Rupalitai Chakankar News)
जामखेड येथील रत्नदीप शैक्षणिक संकुलातील शेकडो विद्यार्थ्यांनी संस्थापकाविरोधात आक्रमक अंदोलन हाती घेतले आहे. आज अंदोलनाचा सातवा दिवस होता. गेल्या सात दिवसांपासून विद्यार्थ्यांच्या आक्रमक अंदोलनामुळे शैक्षणिक वर्तुळातील एका काळ्या अध्यायाचा बुरखा फाडला गेला आहे. विद्यार्थ्यांच्या अंदोलनानंतर डाॅ भास्कर मोरे विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शैक्षणिक मागण्यांची पूर्तता व्हावी व भास्कर मोरेला अटक करण्यात यावी, या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे जामखेडमध्ये अजुनही अंदोलन सुरूच आहे. (Bhaskar More Jamkhed News Today)
जामखेडमध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी हाती घेतलेल्या या अंदोलनाची राज्य महिला आयोगाने स्वता:हून दखल घेतली आहे. आयोगाने अहमदनगरचे जिल्हा पोलिस अधीक्षक यांना जामखेडमध्ये सुरु असलेल्या या प्रकरणाबाबत पत्र लिहीले आहे. या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालय अधिनियम, १९९३ अंतर्गत कलम १०(१) (फ) (एक) व (२) नुसार महाराष्ट्र राज्य महिला आयोगास स्त्रियांच्या तक्रारी विचारार्थ स्विकारणे आणि त्या बाबींची स्वाधिकारे दखल घेणे याकरीता प्राधिकृत करण्यात आले आहे. (Bhaskar More Jamkhed News Today)
अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथील रत्नदीप मेडिकल फाऊंडेशन अॅन्ड रिसर्च सेंटरचे अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे यांच्यावर गुरुवारी रात्री उशिरा शिक्षण घेत असलेल्या एका मुलीच्या फिर्यादीवरुन विनयभंग केल्याबाबतची घटना प्रसार माध्यमाद्वारे प्रसारीत होत आहे. या प्रकरणाची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे. (Bhaskar More Jamkhed News Today)
तरी सदर प्रकरण गंभीर स्वरुपाचे असून प्रकरणाची योग्य ती नियमानुसार चौकशी करुन कार्यवाही करावी व आपण केलेल्या कार्यवाहीचा अहवाल महाराष्ट्र राज्य महिला आयोग कायदा, १९९३ कलम १२ (२) व १२(३) नुसार आयोगास mscwmahilaayog@gmail.com या ई-मेल वर तात्काळ पाठविण्यात यावा, असे या पत्रात म्हटले आहे. सदरचे पत्र समुपदेशक सुनिता गणगे यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आले आहे.(Bhaskar More Jamkhed News Today)
राज्य महिला आयोगाने अहमदनगरचे जिल्हा पोलिस अधीक्षक यांना लिहीलेल्या पत्राची माहिती महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांनी ट्विट (X) केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, अहमदनगर जिल्ह्यातील जामखेडच्या रत्नदीप मेडिकल फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.भास्कर मोरे यांनी महाविद्यालयात एका विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याने सर्व विद्यार्थी आंदोलन करत असल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर त्याच दिवशी मी स्वतः या विद्यार्थ्यांशी संवाद साधला, पोलिसांशीही याप्रकरणी चर्चा केली.या मुलांचे निवेदनही आयोगाला प्राप्त झाले आहे.सद्यस्थितीत गुन्हा दाखल असून फरार आरोपीचा शोध घेत पुढील तपास वेगाने करण्याचे निर्देश आयोगाने पोलिसांना दिले आहेत. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने याची दखल घेत उचित कारवाई करावी असेही आयोगामार्फत कळविण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे. (Rupalitai Chakankar News Today)