सहकारातील धुरंधर, मुत्सद्दी, खमका, निडर, संवेदनशील नेता हरपला : सहकार महर्षी जगन्नाथ (तात्या) राळेभात यांचे निधन

जामखेड टाइम्स वृत्तसेवा ।  सहकार क्षेत्रातील धुरंधर व मुत्सद्दी राजकारणी, गोरगरीब शेतकऱ्यांचे कैवारी अशी ख्याती असलेले अहमदनगर जिल्हा बँकेचे माजी संचालक तथा सहकारमहर्षी जगन्नाथ ( तात्या ) राळेभात यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले.जामखेडच्या राजकारणातील निडर असा खमका नेता हरपला. राळेभात यांच्या निधनाचे वृत्त धडकताच जामखेड तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

Sahakar Maharshi Jagannath (Tatya) Ralebhat passed away

दिवंगत जगन्नाथ (तात्या) राळेभात हे काही दिवसांपासुन आजारी होते.  त्यांच्यावर पुणे येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालवली. ते जिल्हा बँकेचे पंधरा वर्षे संचालक होते.

जामखेड तालुक्यातील सेवा संस्थांवर त्यांचे एक हाती वर्चस्व होते. जगन्नाथ तात्यांना मिस्तरी या नावाने देखील ओळखले जात होते. जिल्हा बँकेच्या संचालक पदाच्या काळात तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी त्यांनी केलेले काम कधीच न विसरता येण्यासारखे आहे.

जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुधीर राळेभात यांचे ते वडील होते. तसेच तालुका विकास अधिकारी सरोदे साहेब यांचे ते सासरे होते.

गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नासाठी बँक कर्जाच्या माध्यमातून मदत करुन कन्यादान करणारं नेतृत्व हारपल्याने तालुक्यातील शेतकरी पोरका झाला आहे. सहकार क्षेत्रातील ही पोकळी कधीच भरुन न निघणारी आहे. सहकार महर्षी जगन्नाथ ( तात्या ) राळेभात यांचे निधनाने संपूर्ण जामखेड तालुक्यात शोककळा पसरली आहे .