संत ज्ञानोबा – तुकोबा पदविका अभ्यासक्रम 2023 : संतांच्या जीवन प्रसंगावर व समाजकार्यावर होणार लेखी परीक्षा, महाराष्ट्रातला पहिला प्रयोग, प्रवेशासाठी इथे करा संपर्क
जामखेड टाइम्स वृत्तसेवा, 30 जून 2023 : महाराष्ट्राचं अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजी महाराज यांच्या इतिहासावर ऐतिहासिक परीक्षा घेणाऱ्या श्रीरायगड ऐतिहासिक विश्वविद्यालय, जामखेड द्वारे आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या जीवन प्रसंगावर व समाजकार्यावर लेखी परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजी महाराज यांच्या इतिहासावर जामखेड येथील श्रीरायगड ऐतिहासिक विश्वविद्यालयाकडून ऐतिहासिक परीक्षा घेतली जाते.एकाच वेळेस महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यात ही परीक्षा आयोजित केली जाते. महाराष्ट्र व महाराष्ट्र बाहेर एकूण 100 पेक्षा जास्त परीक्षा केंद्र असतात. ज्या ठिकाणी विद्यार्थी येऊन परीक्षा देतात.
पुढच्या पिढीला आपला तेजस्वी इतिहास कळावा, आणि त्यातुन एक आदर्श पिढी निर्माण व्हावी या हेतूने विद्यापीठाचे संस्थापक/अध्यक्ष आकाश (दादा) भोंडवे यांनी ही संकल्पना सुरू केली आहे. गेल्या 3 वर्षांपासून हजारो विद्यार्थी ‘शिवशंभू ऐतिहासिक लेखी राष्ट्रीय परीक्षेत’ सहभागी झालेले आहेत. दरवर्षी ही परीक्षा सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात असते. संपूर्ण अभ्यासक्रम pdf स्वरूपात विद्यापीठ कडून देण्यात येतो. विद्यार्थ्यांची परीक्षेच्या दृष्टिकोनातून संपूर्ण तय्यारी देखील करून घेतली जाते,
श्री संत ज्ञानेश्वर महाराज व जगदगुरू संत तुकाराम महाराज यांच्या चरित्रावर ‘संत ज्ञानोबा – तुकाबो पदविका अभ्यासक्रम 2023’ यावर्षीपासून प्रारंभ करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाचा आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर प्रवेश प्रारंभ झालेला आहे. संत व त्यांचे वाड्मय समाजापर्यंत पोहचायला हवे त्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या जीवन प्रसंगावर व समाजकार्यावर लेखी परीक्षा होणार आहे.
वयाची शिक्षणाची अट नाही, अगदी 5 वर्ष ते 100 वर्ष पर्यंत व्यक्ती सदरील परीक्षा देऊ शकतात.परीक्षा ही प्रत्येक विद्यार्थ्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी आयोजित केली जाते आणि काही ठिकाणी अडचण असेल तर online स्वरूपात घेऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जाते.
विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष आकाश (दादा) भोंडवे यांनी संपूर्ण पदाधिकारी व जिल्हाप्रमुख यांच्या वतीने सर्वांना परीक्षेत सहभागी होण्याचे आवाहन केले.
अभ्यासक्रमात सहभागी होण्यासाठी विद्यापीठ सम्पर्क क्रमांक- 8862006599 Shriraigadvishwavidyalay@gmail.com वर सम्पर्क साधावा असे अवाहन करण्यात आले आहे.