Pune ACB Trap Today : महिला कर्मचाऱ्याकडून लाच घेताना वरिष्ठ लिपिक गणेश सुरेश गायकवाड अडकला एसीबीच्या जाळ्यात!
पुणे : Pune ACB Trap Today : अडीच हजार रूपयांची लाच स्विकारताना वरिष्ठ लिपिकास रंगेहाथ पकडण्याची कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज 10 ऑगस्ट 2023 रोजी पार पाडली. या कारवाईने ससून हॉस्पिटलच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
शासकीय सेवेत असलेल्या एका 46 वर्षीय महिलेने 1,07,000/- रू. चे वैद्यकिय देयक फाईल मंजुरीकरिता वैद्यकीय आवक जावक विभाग, अधीक्षक कार्यालय, ससून हॉस्पिटल येथे 21/07/2023 रोजी सादर केली होती. सदर वैद्यकिय देयकामधे त्रुटी न काढता फाईल पूर्ण करून देण्याकरिता (Ganesh Suresh Gaikwad) गणेश सुरेश गायकवाड, वय 49 वर्ष, वरिष्ठ लिपिक (वर्ग-3), अधीक्षक कार्यालय, ससून रुग्णालय, पुणे. याने सदर महिला कर्मचाऱ्याकडे 3 हजार रुपयांची लाच मागणी होती. याबबत तक्रारदार यांनी ला.प्र.वि. पुणे येथे तक्रार दिली होती.
याबाबत पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सदर तक्रारीची 9 ऑगस्ट 2023 रोजी पडताळणी केली होती. त्यानुसार 10 ऑगस्ट 2023 रोजी 4था मजला, नवीन इमारत, ससून हॉस्पिटल, पुणे येथे पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लावलेल्या सापळ्यात वरिष्ठ लिपिक (Ganesh Gaikwad) गणेश सुरेश गायकवाड, वय 49 वर्ष, याला अडीच हजार रूपयांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. सदर लाचखोर वरिष्ठ लिपिकाविरोधात बंडगार्डन पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
➡ घटक :- पुणे
➡ तक्रारदार :- स्त्री, वय 46 वर्ष
➡ आरोपी लोकसेवक :- गणेश सुरेश गायकवाड, वय 49 वर्ष, वरिष्ठ लिपिक (वर्ग-3), अधीक्षक कार्यालय, ससून रुग्णालय, पुणे.
➡ लाच मागणी :- 3,000/- रुपये
➡ लाच स्विकारली :- 2,500/- रुपये
➡ पडताळणी दिनांक :- 09/08/2023.
➡ सापळा दिनांक व ठिकाण :- दिनांक 10/08/2023 रोजी 4था मजला, नवीन इमारत, ससून हॉस्पिटल, पुणे.
➡ हकीकत :- यातील तक्रारदार या शासकीय सेवक असून त्यांचे 1,07,000/- रू. चे वैद्यकिय देयक फाईल मंजुरीकरिता वैद्यकीय अवाक जावक विभाग, अधीक्षक कार्यालय, ससून हॉस्पिटल येथे 21/07/2023 रोजी सादर करण्यात आले होते. सदर वैद्यकिय देयकामधे त्रुटी न काढता फाईल पूर्ण करून देण्याकरिता 3,000/- रुपयांची लाच मागणी केल्याने तक्रारदार यांनी ला.प्र.वि. पुणे येथे तक्रार दिली होती.
तक्रारदारांनी दिलेल्या तक्रारीची पडताळणी केली असता, लोकसेवक गणेश सुरेश गायकवाड यांनी तक्रारदार यांचे वैद्यकीय देयकामधे त्रुटी न काढता फाईल पूर्ण करून देण्याकरिता 3,000/- रूपयाची लाच मागणी करून तडजोडीअंती 2,500,/- रुपये त्यांचे कार्यालयात पंचासमक्ष स्विकारल्यावर त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले असून, बंडगार्डन पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.