जामखेड टाइम्स वृत्तसेवा : अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी (rahuri) तालुक्यात दुहेरी हत्याकांडाची घटना घडली आहे. या घटनेत वकिली क्षेत्रात कार्यरत असलेल्या आढाव (Adhav murder news) दाम्पत्याचा निर्घृण खून झाल्याचे उघड झाले आहे. आढाव दाम्पत्य गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होते. त्यांचे मृतदेह राहुरी तालुक्यातील उंबरे (rahuri umbare news) येथील स्मशानभुमीतील विहिरीत आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
राहुरी न्यायालयात वकिली क्षेत्रात कार्यरत असलेले अॅड. राजाराम आढाव व अॅड. मनिषा आढाव (Adv. Rajaram Adhav, Adv. Manisha Adhav murder case) हे दाम्पत्य गुरूवारी (दि.२५) दुपारपासून बेपत्ता होते. यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. त्यानंतर पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू होता. राहुरी न्यायालय परिसरात आज शुक्रवारी (दि.२६) अॅड. आढाव यांचे चारचाकी वाहन (क्र. एम एच १७ एइ २३९०) बेवारस अवस्थेत आढळून आले. या चारचाकी वाहनाची तपासणी केली असता या वाहनात हातमोजे व एक बूट आढळून आला. तसेच अॅड. आढाव यांचे एटीएम आयसीआय बँकेसमोर बेवारस आढळून आले. त्यामुळे या घटनेबाबत शंका – कुशंका व्यक्त केल्या जात होत्या.
या वाहनाची तपासणी करीत असताना या वाहनाजवळ असणाऱ्या एका चारचाकी वाहनातील चालकाने पोलिसांना पाहून पळ काढला. त्यांनंतर पोलिसांना तपासाची चक्रे फिरवत तपासाला गती दिली. मोबाईल फोन व सीसीटिव्ही कॅमेर्याच्या सहाय्याने एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीतून दाम्पत्याचा खून करून विहिरीत टाकल्याची माहिती समोर आली. या खून प्रकरणामध्ये चार आरोपींचा समावेश असल्याचेही माहिती समोर आली आहे.
उंबरे (ता.राहुरी) येथील स्मशानभुमीतील विहिरीत दुपारी तीन वाजल्यापासून दोघांचा शोध सुरू होता. रात्री उशिरा दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली. मृतदेहांना दगड बांधून विहिरीत टाकण्यात आले होते. दरम्यान, या खून प्रकरणामुळे राहुरी तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
आढाव दाम्पत्य राहुरी तालुक्यातील मानोरी येथील आढाव वस्तीत राहते. ते दोघेही राहुरी येथील न्यायालयात वकिली व्यवसाय करत होते. राजाराम आढाव गुरूवारी दुपारपर्यंत न्यायालयात कामकाज करत होते. त्यानंतर दुपारी दोन वाजेच्या दरम्यान ते नगरला गेले होते. एका पक्षकाराला पाठवून त्यांनी पत्नी मनीषाला बोलावून घेतलं होतं, अशी माहिती मिळतेय.तेव्हापासूनच आढाव दाम्पत्य बेपत्ता झाल्याची चर्चा सुरू होती.(Advocate Couple Death Rahuri) होती.
पोलिस निरीक्षक ठेंगेंनी आढावांच्या कारची तपासणी केली. यात त्यांना एक हातमोजा, दोर, मोबाईलचे कव्हर आणि एक बूट आढळून (Advocate Couple Death) आला. पोलिसांनी न्यायालय परिसरात पुन्हा तपासणी केली. तेव्हा त्यांना आढावांची दुचाकी न्यायालयाच्या मागील बाजूला आढळली.आढाव यांचं एटीएम कार्ड राहुरी येथील आयसीआयसीआय बँकेसमोर सापडलं.गुन्हे शोध पथकाने पोलिसांना पाहून निघून गेलेल्या कारचा शोध घेतला. यात त्यांनी तिन संशयितांना ताब्यात घेतलं.
पोलिसांनी कसून चौकशी केली. तेव्हा या तिघांनी आढाव दाम्पत्याबरोबर केलेल्या घटनेची माहिती दिली. आढाव दाम्पत्याची अगोदर हत्या केली. त्यानंतर त्यांना (Rahuri) राहुरीतील उंबरे गावातील स्मशानभूमीच्या बाजूला असलेल्या बारवमध्ये मोठ्या दगडाला बांधून टाकलं, अशी माहिती त्यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. त्या बारवमधील पाणी उपसलं अन् आढाव दाम्पत्यांचे मृतदेह बाहेर (Ahmednagar Crime) काढले.
या हत्येत आणखी दोघा संशयितांची नावं समोर येत आहेत. परंतु ते दोघे पसार झाले आहेत, त्यांचा शोध घेतला जातोय. मनीषा यांच्या माहेरकडील मालमत्तेच्या वादातून हत्या झाली, असं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलंय. राहुरी पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक या घटनेचा कसून शोध घेत आहे.