Shailesh Mohite Patil : महाराष्ट्रात आणखीन एका पुतण्याने सोडली काकाची साथ, अजित पवार गटाला मोठा धक्का !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Shailesh Mohite Patil : राज्याच्या राजकीय पटावर रोज कुठे ना कुठे राजकीय भूकंप होत आहे त्यामुळे राज्याच्या राजकारणात कधी काय होईल याचा नेम नाही. राज्याच्या राजकारणात काका – पुतण्या फुटीचे लोण पसरू लागले आहे. पुणे जिल्ह्याच्या राजकारणातील अशीच एक काका – पुतण्याची जोडी फुटली आहे. या राजकीय भूकंपाचा धक्का जितका काकाला बसला आहे त्याहीपेक्षा अधिक धक्का राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना बसला आहे. पवार यांच्या विश्वासू गोटातील शिलेदाराने राष्ट्रवादीला राम राम ठोकला आहे. या राजकीय भुकंपामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
पुणे जिल्ह्याच्या राजकारणातील मोठे प्रस्थ असलेल्या मोहिते कुटूंबातील सदस्य असलेल्या शैलेश मोहिते (Shailesh Mohite Patil) यांनी आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. शैलेश मोहिते हे राष्ट्रवादीत सक्रीय होते. अजित पवार यांचे अत्यंत जवळचे म्हणून त्यांना ओळखले जात होते. परंतू आता त्यांनी राष्ट्रवादीची साथ सोडत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. त्यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.
यापुर्वी पिंपरी चिंचवडचे माजी महापौर तथा अजित पवार यांचे विश्वासू सहकारी संजोग वाघेर यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता, त्यानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते यांचे पुतणे डाॅ शैलेश शिवाजीराव मोहिते यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. हे दोन्ही नेते अजित पवार यांच्या खास गोटातील ओळखले जात होते. वाघेर व मोहिते यांनी अजित पवारांची साथ सोडल्यामुळे पुणे जिल्ह्याच्या राजकारणात राष्ट्रवादीला जोरदार धक्का बसला आहे. मावळ व शिरूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघात उध्दव ठाकरे यांनी जोरदार मोर्चेबांधणी हाती घेतली आहे हेच यातून स्पष्ट होत आहे.
कोण आहेत शैलेश मोहिते Shailesh Mohite Patil ?
डॉ. शैलेश शिवाजीराव मोहिते पाटील हे आमदार दिलीप मोहितेंचे चुलत पुतणे आहेत. त्यांना राष्ट्रवादीमध्ये अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या. ते महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी सरचिटणीस आहेत. तसेच ते महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष देखील आहेत. त्यासोबतच त्यांच्यावर पक्षानं उत्तराखंड, झारखंड, छत्तीसगड, लक्षद्वीपमध्ये निरीक्षक म्हणून देखील जबाबदारी सोपवली होती.
अजितदादांच्या समर्थक नेत्याने शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला आहे. अजित पवार यांचे खंदे समर्थक डॉ. शैलेश शिवाजीराव मोहिते पाटील (Shailesh Mohite Patil) यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. शैलेश मोहिते यांनी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन हाती बांधून घेतलं. हजारो समर्थांसह मोहिते यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. तळेगावमध्ये आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत शैलेश मोहितेंचा शिवसेनेत पक्षप्रवेश झाला आहे. शिवसेना ठाकरे गटाने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला खेड, राजगुरूनगरमध्ये जोरदार धक्का दिलाय. यापूर्वी मावळ लोकसभेत वाघरे यांच्या रूपाने तर आता शिरूर लोकसभेत शैलेश मोहिते यांच्या रूपाने उध्दव ठाकरेंनी अजित पवारांना जोरदार धक्के दिलेत.
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सुरु असलेल्या राजकीय भूकंपामुळे आगामी लोकसभा निवडणूक मोठ्या चुरशीच्या वातावरणात पद पडणार असेच चित्र आता दिसू लागले आहे. उध्दव ठाकरे गटाने अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला भगदाड पडल्यानंतर आता अजित पवार ठाकरे गटाला कोणता धक्का देणार याकडे राजकीय वर्तुळाचे लाख लागले आहे. (Shailesh Mohite Patil)