कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार पोलिसांच्या ताब्यात, शरद मोहोळचा गेम कोणी वाजवला ? कारण काय ? वाचा सविस्तर !

पुणे । 5 जानेवारी 2024 :  Sharad Mohol murder case : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ यांची शुक्रवारी दुपारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. शरद मोहोळ याच्या मारेकऱ्यांचा छडा लावण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. शरद मोहोळ या कुख्यात गुंडाची जमिनीच्या वादातून हत्या करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी प्रकरणातील मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याचबरोबर इतर सात जणांनाही ताब्यात घेतले आहे.

Sharad Mohol News, Notorious goon Sharad Mohol murder case mastermind in police custody, who played Sharad Mohol's game? what is reason Read in detail,

शुक्रवारी दुपारी पुण्यातील कोथरुड परिसर गोळीबाराच्या घटनेनं हादरून गेला. कोथरुड भागातील सुतारदरा भागात कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर गोळीबार करण्यात आला होता. या घटनेत तो गंभीर जखमी झाला होता. त्याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते, परंतू उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.या घटनेनंतर पुणे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने हाती घेतली होती. जमिनीच्या वादातून शरद मोहोळ याची हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले होते. पुणे पोलिसांच्या तीन पथकांनी वेगाने केलेल्या तपासानंतर शरद मोहोळ याच्या मुख्य मारेकऱ्यांना शोधण्यात यश मिळाले आहे. 

शरद मोहोळ हत्याकांड प्रकरणात पुणे पोलिसांनी मुख्य आरोपी साहिल ऊर्फ मुन्ना पोळेकर या मुख्य आरोपीला अटक केली आहे. मुन्नासह एकुण आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शिवापुर टोलनाका परिसरातून आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई पार पाडली.

कुख्यात गुंड शरद मोहोळचा असा झाला गेम

शरद मोहोळ शुक्रवारी दुपारी एक वाजता घराबाहेर पडला होता. त्यावेळी आरोपी त्याच्यासोबतच होते. शरद मोहोळ पुढे चालत असताना मुन्ना पोळेकर याने गोळी मारली, पायाला आणि पाठीला गोळी लागली. शरद मोहोळ हा हल्ला कोणी केला हे पाहायला मागे फिरला त्यावेळी त्याच्या छातीत गोळी मारली. आवाजाने सर्वजण बाहेर आले तेव्हा शरद मोहोळ जखमी अवस्थेत पडला होता तर घटनास्थळावरुन आरोपी पसार झाले होते.  जखमी शरद मोहोळला उपचारासाठी हॉस्पीटल नेण्यात आले पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

पुणे सातारा रोडवर किकवी ते शिरवळ दरम्यान तपासात संशयित निष्पन्न झालेल्या संशयित स्विफ्ट गाडीचा पाठलाग करून 8 आरोपींना ताब्यात घेतलं. आरोपींकडून 3 पिस्टल, 3 मॅगझीन, 5 राउंड व 2 चार चाकी गाड्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत.