राहुरी दुहेरी हत्याकांड प्रकरणात समोर आली धक्कादायक माहिती, ‘या’ कारणासाठी आरोपींनी केली आव्हाड दाम्पत्याची हत्या, पोलिसांनी आवळल्या चौघा आरोपींच्या मुसक्या !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : वकिल दाम्पत्याचे (पती-पत्नी) अपहरण करून त्यांची हत्या (murder) करण्यात आल्याची धक्कादायक घटना राहुरी (rahuri news) तालुक्यातून समोर आली होती. या घटनेत आरोपींनी दोघा पती – पत्नीचे मृतदेह उंबरे (umbare) गावातील स्मशानभुमीतील विहिरीत टाकले होते. सदर घटना उघडकीस येताच राहुरी पोलिस (Rahuri Police) व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने तपास हाती घेतला होता. या प्रकरणात पोलिसांनी चौघा आरोपींच्या मुसक्या आवळ्याची धडक कारवाई केली आहे. (Adv. Rajaram Adhav murder news, Adv. Manisha Adhav murder case)

Shocking information has come out in Rahuri double murder case, for this reason accused killed advocate couple, Rahuri police arrested four people, Adv. Rajaram Adhav, Adv. Manisha Adhav murder case, crime News today,

दुहेरी खुन प्रकरणात पोलिसांच्या तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. राहुरी न्यायालयात वकिलीचा व्यवसाय करणारे राजाराम आढाव आणि त्यांची पत्नी मनीषा आढाव (Adv. Rajaram Adhav, Adv. Manisha Adhav) यांची हत्या खंडणीसाठी झाल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. हत्येपुर्वी आरोपींनी कट रचून, छळ करून आढाव दाम्पत्याची हत्या केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. एकुणच या खून प्रकरणामुळे सर्वत्र मोठी खळबळ उडवून दिली आहे.

आढाव दाम्पत्यांचे मारेकरी गजाआड

आढाव दाम्पत्य खून प्रकरणात पोलिसांनी वेगाने तपास केला असता या प्रकरणात सागर साहेबराव खांदे ऊर्फ भैया (रा. येवले आखाडा), शुभम संजित महाडिक (रा. गणपतवाडी शाळेजवळ, मानोरी), किरण नानाभाऊ दुशिंग ऊर्फ दत्तात्रय (वय ३२), हर्षल दत्तात्रय ढोकणे, बबन सुनील मोरे (सर्व रा. उंबरे, ता. राहुरी) या प्च सराईत गुन्हेगारांची नावे समोर आली आहेत. यापैकी किरण दुशिंग, सागर खांदे, शुभम महाडिक आणि हर्षल ढोकणे या चौघांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती राहुरी पोलिसांनी दिली आहे. (Kiran dushing, Sagar khande, shubham mahadik, Harshal Dhokane)

असा लागला आरोपींचा छडा

राहुरी (Rahuri) आणि स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी वकील राजाराम आणि त्यांची पत्नी मनीषा आढाव यांच्या बेपत्ता तक्रारीची दखल घेत तपास केला. राहुरी न्यायालय परिसरातील सीसीटीव्हीमधील चित्रीकरण पोलिसांनी तपासले. याशिवाय आढाव वकील दाम्पत्याकडे कोणकोणत्या आरोपींचे वकीलपत्र होते, याची माहिती घेतली. यात मानोरी परिसरामध्ये एक संशयित कार फिरत असल्याचे दिसले. या कारचा शोध घेतल्यावर ती रेकॉर्डवरील गुन्हेगार किरण दुशिंग वापरत असल्याचे समोर आले. तसेच किरण दुशिंग याच्या वॉरंटबाबतचे प्रकरण आढाव वकील दाम्पत्याकडे होते.

पाच लाख रुपयांच्या खंडणीसाठी वकिल दाम्पत्याची हत्या

पोलिसांनी किरण दुशिंग याला ताब्यात घेत चौकशी केली. यावर त्याने साथीदारांच्या मदतीने कट करून आढाव वकील दाम्पत्याला खटल्याच्या कामकाजासाठी बोलावून घेतले. यानंतर दुशिंग याने स्वत:च्या गाडीत बसवून घेऊन आढाव दाम्पत्याला त्यांच्याच घरी घेऊन गेले. तेथे दोघांचे हात-पाय बांधून ठेवले. पाच लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. परंतु आढाव दाम्पत्याने त्यांना पैसे देण्यास नकार दिला. यातून आरोपींनी आढाव यांचा त्यांच्याच घरामध्ये पाच ते सहा तास छळ केला.

डोक्यामध्ये प्लास्टिक पिशव्या घालून करण्यात आली हत्या

यानंतर आढाव दाम्पत्याला कारमध्ये बसवून त्यांना मानोरी गावाच्या बाहेर घेऊन गेले. रात्रीच्या सुमारास दोघांच्या डोक्यामध्ये प्लास्टिक पिशव्या घालून त्यांना मारण्यात आले. आढाव दाम्पत्याचे मृतदेह उंबरे गावातील स्मशानभूमीजवळ असलेल्या विहिरीमध्ये दगड बांधून टाकून दिले. यानंतर वकील आढाव दाम्पत्याची कार राहुरी न्यायालय परिसरात लावली, अशी माहिती पोलिसांसमोर किरण दुशिंग याने दिली.

आढाव दाम्पत्य हत्या प्रकरणातील आरोपी सराईत गुन्हेगार

तक्रारदार लता राजेश शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून राहुरी पोलिस ठाण्यात खुनाचे, अपहरणाच्या गुन्ह्याचे कलम वाढवण्यात आले आहे. किरण दुशिंग हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्याविरुद्ध खून, जबरी चोरी, घरफोडी, खंडणी अशा गंभीर स्वरुपाचे १२ गुन्हे दाखल आहेत. याशिवाय सागर खांदे हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्याविरुद्ध दरोडा, आर्म अ‍ॅक्ट असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

राहुरी पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने आढावा दाम्पत्य खून प्रकरणाचा तातडीने छडा लावत चौघा आरोपींच्या मुसक्या आवळण्याची धडक कारवाई पार पाडली आहे. पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.